आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाख सीमेवर चीनची महिन्यात १२ वेळा घुसखोरी; 'आयटीबीपी'च्या अहवालात गौप्यस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑगस्ट महिन्यात चीनने लडाखच्या विविध सेक्टरमध्ये १२ वेळा घुसखोरी केली. भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) अहवालात याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. जुलैतही चिनी सैनिकांनी विविध भागांत ८ वेळा शिरकाव केला होता. 


अहवालानुसार, चिनी सैनिक लडाखच्या ट्रिग हाइट व ट्रॅक जंक्शनमध्ये ७ ऑगस्ट व १६ ऑगस्टला ६ किमीपर्यंत घुसले होते. डेपसांगमध्ये पाच वेळा घुसखाेरी करण्यात आली होती. ते सर्वप्रथम ४ ऑगस्टला १८ किमी अात शिरले होते. मात्र भारतीय जवानांनी विरोध केल्यानंतर ते परत गेले. मात्र, पुन्हा १२, १३, १७ व १९ अॉगस्टला त्यांनी भारतीय भागात घुसखोरी केली. 


लडाखचा ट्रिग हाइट व डेपसांगचा भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथे चीन सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. याच भागात भारताचे दौलतबेग ओल्डी एअरफील्डही आहे. चिनी सैनिकांनी पेगाेंग सो लेकच्या भागातही ऑगस्टमध्ये ५ वेळा घुसखोरी केली. गतवर्षी ऑगस्टमध्ये याच भागात चिनी सैनिकांनी भारतीय सुरक्षादलांवर दगडफेक केली होती. 

बातम्या आणखी आहेत...