आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान उड्डाणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने चीनच्या शेतकऱ्याने स्वत: काँक्रीटची एअरबस बनवली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमधील एका व्यक्तीने उराशी बाळगलेले स्वप्न साकारले नाही म्हणून एक लक्षणीय कामगिरी केली. लसूण उत्पादक असलेले झू यूए यांना विमान उड्डाण करण्याची इच्छा होती. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण झाले नाही. अखेर त्यांनी स्वत:च एक विमान तयार करण्याचे ठरवले. त्यांनी हुबेहूब एअरबस ए-३२० ची प्रतिकृती तयार केली. उत्तर-पूर्वेकडील चीनच्या गव्हाच्या शेतातील एका धावपट्टीवर उभे असलेले हे विमान कोणाचेही लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. 


शेतकरी झू माध्यमिक शिक्षणही घेऊ शकलेले नाहीत. शिक्षणात अयशस्वी असल्याने त्यांनी कांदा-लसणाची शेती करण्यास सुरूवात केली. परंतु विमान उड्डाणाचे स्वप्न मनात असलेल्या झू यांना कायुुन शहरातील वेल्डिंग वर्क करणाऱ्या कारखान्यातही काम करावे लागले. त्यामुळे निराश झालेल्या झु यांना आता कधीही विमान उड्डाण करता येणार नाही, असे वाटू लागले. झू म्हणाले, 'माझे अर्धे वय झाले आहे. आता विमानाची खरेदी करू शकत नाही. परंतु ते तयार करू शकतो. ही गोष्ट मला समजली होती.' 


विमान तयार करण्याची मोहिम त्यांनी हाती घेतली. त्यांनी आयुष्यभराची कमाईची रक्कम सुमारे २.७५ कोटी रुपये या कामाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी खर्च केले. सुरुवात एअरबस ३२० च्या खेळण्यापासून केली. ते खऱ्या विमानाच्या आकाराच्या सुमारे १८ वा भाग एवढे होते. या मॉडेलच्या मदतीने त्यांनी मापन केले. ऑनलाइन छायाचित्रांना बारकाईने अभ्यासले. त्यात अनेक चुकाही झाल्या. परंतु त्यांनी विमानाचा मुख्य भाग, पंख, काॅकपिट, इंजिन व शेपटाचा भाग साकारलाच. त्यासाठी ६० टन स्टीलचा वापर करण्यात आला. विमानाचे शौकिन असलेल्या त्यांच्या पाच सहकारी शेतमजुरांनी त्यांना या कामात मदत केली. एकीकडे मी पैसे मिळवत होतो आणि तेच पैसे स्वप्न साकारण्यासाठी खर्च करत होतो, असे झू यांनी सांगितले. 


विमानाच्या प्रतिकृतीमध्ये आता ढाबा सुरू केला जाणार 
विमानाच्या प्रतिकृतीमध्ये ढाबा सुरू करण्याची झू यांची योजना आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये त्यांनी स्वत: तयार केलेली व विमानांत आवश्यक उपकरणेही दिसतात. लवकरच लाल कार्पेट टाकले जाणार आहे. एअरबसच्या १५६ आसनांना येथे ३६ प्रथम श्रेणींच्या आसनांत रुपांतरित केले आहे, अशी माहिती झू यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...