आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे माजी उपमंत्री मा जियान यांना जन्मठेप; देशविरोधी हेरगिरीच्या प्रकरणात दोषी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनचे गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख तथा उप संरक्षण मंत्री मा जियान यांना लाचखोरी व देशाची गुपिते शत्रूला दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात ईशान्येकडील एका न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

 

लाच स्वीकारणे तसेच देशाची गुपिते इतरांना विकण्याच्या कामासाठी सहकाऱ्यांना भरीस पाडण्याचे काम करणे आदी आरोप जियान यांच्यावर होते. हे आरोप सिद्ध झाले असून ते दोषी आढळून आल्याचे लिआेनिंग येथील डालियन इंटरमिडिएट कोर्टाने जाहीर केले. न्यायालयाने दोषी ठरवले अाहे. आता वरिष्ठ न्यायालयात जाणार नाही, असे जियान यांनी स्पष्ट केले आहे. जियान यांचे राजकीय अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी ऑगस्टमध्ये बंद दरवाजाआड झाली होती. हे प्रकरण सुरक्षाविषयक संवेदनशील माहितीशी निगडित असल्यामुळे ही सुनावणी बंद दाराआड करण्यात आली होती. २०१५ मध्ये जियान यांनी भ्रष्टाचार केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याकडून उप संरक्षण मंत्री पद काढून घेण्यात आले होते

 

जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा दणका
राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली. त्यात अनेक बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेमुळे केंद्रीय राजकीय व विधी व्यवहार आयोगाचे सचिव झू याँगकांग, चाँगिंगचे कम्युनिस्ट पार्टीचे चिटणीस सुन झेंगसाई, केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष शु चायहोऊ, लष्करी आयोगातील गुआ बॉक्सिआंग, सीपीसी कार्यालयातील संचालक लेंग जिहुआ या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा झाली आहे. जिनपिंग २०१२ पासून सत्तेवर आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...