आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या भारतीय कंपन्यांना १५-२० टक्के महसुली ताेटा शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनमध्ये भारताच्या १३० पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत : सीआयआय
  • दीर्घकालीन सुट्यांमुळेही कमी परिणाम झाला

नवी दिल्ली - चीनमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांवरही कोरोना व्हायरसचा परिणाम हाेत आहे.. भारतीय उद्योग संस्था सीआयआयने केलेल्या सर्वेक्षणानुसार या विषाणूमुळे चीनमधील भारतातील जवळपास १३० कंपन्यांचा महसूल २०२० च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत १५ ते २० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.



चीनमधील भारतीय कंपन्यांसमोर आता टॅलेंट हायर करणे आणि ते कायम टिकवण्याचे माेठे आव्हान असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. आता तेथील बहुतांश लाेकांना आपल्या घराच्या आसपासच नाेकरी करायची आहे.  सोमवारी रात्रीपर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे २,६६६ जण ठार झाले. संक्रमित लोकांची संख्या ७७७८० वर पोहोचली आहे. चीनमधील लाेक व सामानाची वाहतूक नियंत्रित  राहणार आहे. 



दीर्घकालीन सुट्यांमुळेही कमी परिणाम झाला


या सर्वेक्षणानुसार चीनमधील भारतातील जवळपास ७० टक्के कंपन्या शांघाय, बीजिंग आणि गुआंग्डोंग, जिआंग्सू आणि शेडोंग अशा राज्यांमध्ये आहेत. त्यांचे व्यावसायिक भागीदार देशभर पसरलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे चिनी नववर्षाच्या सुट्या दीर्घकाळ वाढवण्यात आल्या. त्यामुळे कंपन्यांची उत्पादकता कमी झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलवर झाला आहे.

जागतिक जीडीपीमध्ये चीनचा वाटा आहे १९.७१ %


विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे म्हटले आहे. क्रयशक्ती मापदंडानुसार जगाच्या जीडीपीमध्ये चीनचा वाटा १९९.७१ टक्के आहे. कोरोना विषाणूमुळे २०२२ मधील चीनची जीडीपी वाढ १ ते १.२५ % कमी होऊ शकते. जागतिक जीडीपीवर याचा ०. ५ % पर्यंत नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.