आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अत्याधुनिक समुद्री रडार भारतावर सलग लक्ष ठेवू शकते 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने कॉम्पॅक्ट आकारातील एक आधुनिक रडार तयार केले आहे. हे रडार संपूर्ण भारतावर सातत्याने नजर ठेवून असेल. बुधवारी माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, देशी स्तरावर विकसित करण्यात आलेल्या हे रडार सिस्टिमद्वारे चीनची नौसेना आपल्या देशातील समुद्र परिसरावर लक्ष ठेवून असेल. त्याचबरोबर ही यंत्रणा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत शत्रूंच्या जहाजांवर, विमानावर तसेच क्षेपणाास्त्रावरून येणाऱ्या धोक्याची सूचना खूप आधीच त्यांच्या सैन्याला देईल. 

 

चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसचे शिक्षणतज्ज्ञ लियू योंगतान यांना चीनचे अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान अपग्रेड करण्याचे श्रेय दिले जाते. चायनीज अकादमी ऑफ इंजिनिअरिंगलाही यात महत्वाचे योगदान आहे. चीनने या यशासाठी लियू योंगताना यांचा गौरव केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...