Home | Business | Gadget | China's Shanghai 5-G Connecticut World's First Town

चीनचे शांघाय ५-जी जोडणीचे जगातील पहिले शहर, १ जीबीचा चित्रपट १ ते ५ सेकंदांत डाऊनलोड होईल

वृत्तसंस्था | Update - Mar 31, 2019, 09:03 AM IST

२.६३ कोटी लोकसंख्येच्या शहरात १० हजार फाइव्हजी बेस स्टेशन होणार, वापरकर्त्यांना क्रमांक न बदलता मिळणार सुविधा

  • China's Shanghai 5-G Connecticut World's First Town

    बीजिंग - चीनचे शांघाय शहर फाइव्हजी कव्हरेज व ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नेटवर्कचे जगातील पहिले शहर ठरले आहे. ५जीची स्पीड ४जी नेटवर्कच्या तुलनेत १० ते १०० पटीपर्यंत वेगवान असेल. यामुळे एक जीबीचा चित्रपट केवळ ५ सेकंदांत डाऊनलोड होईल. एवढेच नव्हे तर ही सुविधा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर युजर्सना क्रमांक न बदलता सेवा मिळण्यास सुरुवात होईल. सरकारी प्रसारमाध्यम चायना डेलीने केलेल्या दाव्यानुसार, २.६३ कोटी लाेकसंख्येच्या शांघायमध्ये ५जी कव्हरेज नेटवर्कची चाचणी यशस्वी झाली आहे. शनिवारी अधिकृतरीत्या ही सेवा शांघायच्या हाँग काऊमध्ये सुरू झाली. चायना मोबाइलचे उपाध्यक्ष जियान किन म्हणाले, ५जी सेवा सुरू झाल्यामुळे शहरात इंटरनेटशी संबंधित टॅक्सी व्यवसाय व आरोग्यासंबंधी तंत्रज्ञान वाढेल. शहर स्मार्ट बनवण्यासही मदत मिळेल. जियान यांच्यानुसार, शांघायला स्मार्ट बनवण्यासाठी १०० पेक्षा जास्त कंपन्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यामुळे शांघायचे औद्योगिक उत्पादन १.०३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी शांघायमध्ये १० हजारांहून जास्त ५जी बेस स्टेशनची निर्मिती होईल. २०२१ पर्यंत हे ३० हजारांवर पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अहवालानुसार, चिनी कंपनी हुवावेला अमेरिकेसह अनेक देशांत ५जीच्या चाचणीस विरोध झाला. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, चीन हेरगिरीसाठी हुवावेच्या नेटवर्कचा वापर करू शकतो. त्यामुळे चीन नव्या पिढीतील मोबाइल नेटवर्क प्रकरणात अमेरिका व अन्य देशांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

    पहिल्या फोल्डेबल फोनद्वारे पहिली व्हिडिओ कॉलिंग
    शुभारंभावेळी शांघायचे उपमहापौर वू किंग यांनी जगातील पहिल्या ५ जी फोल्डेबल फोन हुवावे मेट एक्सद्वारे व्हिडिओ कॉलही केला. शहरातील दुसऱ्या भाागात उभ्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. या व्हिडिओ काॅलिंगची गुणवत्ता हायडेफिनेशन(एचडी) होती. ५जी नेटवर्कमुळे एक जीबी ते एक टीबीपर्यंतचा डेटा ५ सेकंदांत हस्तांतरित होईल.

Trending