आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकडाची सर्वात माेठी ‘ड्रॅगन हाेडी’ बनवून चीनचा विक्रम कंबोडियाने माेडला,179 लाेक बसू शकतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोमपेन्ह- लाकडाची सर्वात माेठी नाव (हाेडी) बनवून कंबाेडियाने चीनचा दाेन वर्षांपूर्वीचा विक्रम माेडला. ८७.३ मीटर लांब व १.९४ मीटर रुंद या ड्रॅगन हाेडीची नाेंद गिनीज बुकात करण्यात अाली. ‘गिनीज’चे अधिकारी प्रवीण पटेल यांनी साेमवारी मिकांग नदीपात्रावर या विक्रमाचे प्रमाणपत्र साेपवले. प्री वेंग प्रांतील एका युवा संघाने ६ महिन्यांत ही हाेडी तयार केली. जुनी संस्कृती, पूर्वज व खमेर राजांच्या स्मृती जतन करण्यासाठी ही हाेडी तयार केल्याचे ते सांगतात. कंबोडियात ड्रॅगन नाैकांचा उपयाेग परिवहन व अापल्या सीमा सुरक्षेसाठी केला जाताे.

 

मे २०१६ मध्ये चीनने केला हाेता विक्रम  

‘गिनीज बुक’चे प्रवीण पटेल यांनी सांगितले, यापूर्वी २८ मे २०१६ रोजी चीनने ७७.८ मीटर लांब ड्रॅगन नाैका बनवून विश्वविक्रम केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...