आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या बँकांनी आरकॉमला मागितले 15 हजार काेटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्ज प्रकरणात अडकलेल्या अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार आता चायना डेव्हलपमेंट बँक, इंडस्ट्रियल बँक ऑफ चायना आणि एक्झिम बँक ऑफ चायनासह चीनच्या अनेक कर्जदात्यांनी अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून जवळपास २.१ अब्ज डॉलर (जवळपास १५ हजार कोटी रुपये) ची मागणी केली. आरकॉमने गेल्या वर्षीच दिवाळखोरी अंतर्गत कारवाई सुरू केली होती. 


कंपनीच्या वतीने शेअर बाजाराला देण्यात आलेल्या फायलिंगनुसार चीन सरकारची मालकी असलेली चायना डेव्हलपमेंट बँक ९,८६० कोटी रुपयांच्या कर्जासह दूरसंचार कंपनीची सर्वात माेठी कर्जदाता बँक आहे, तर एक्झिम बँक ऑफ चायनाने कंपनीकडे ३,३६० कोटी रुपये, तर कमर्शियल बँक ऑफ चायनाने १.५५४ कोटी रुपयांचा दावा केला आहे. देशातील दिवाळखोरी न्यायालयात सध्या विदेशी कर्जदात्यांची बाजू ऐकून घेण्यात येत असून अनिल अंबानी यांची दूरसंचार कंपनी मालमत्तेसाठी खरेदीदारांचा शोध घेण्याचा आणि कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहे. 


मुकेश अंबानींनी केली होती मदत 
अनिल अंबानी यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने आधी ऑरकॉमच्या मालमत्तेसाठी १७,३०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र, नियामकीय अडचणी आल्यामुळे हा करार अडकला होता. मुकेश अंबानी यांनी त्यांचा छोटा भाऊ अनिल यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडून इरिक्सन एबीला ८ कोटी डॉलर दिले होते. आरकॉमने सोमवारीच त्यांच्या फायनान्शियल क्रेडिटर्सची यादी जाहीर केली होती. 


रिलायन्स इंफ्राच्या शेअरमध्ये तीन आठवड्यांत ५७% घसरण 
अनिल अंबानीची कंपनीच्या शेअरमध्ये तीन आठवड्यांत ५७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. कंपनीने ३१ मार्च २०१९ पर्यंत सादर केलेल्या निकालात एकूण ३,३०१ कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला होता. कंपनीचा शेअर विक्रमी नीचांकी १६.९० रुपयांवर बंद झाला झाला. हा सोमवारी ५६ रुपयांवर बंद झाला होता. 


एकूण ५७,३८२ कोटी थकीत 
कंपनी थकीत रक्कम 
एडीए ग्रुप 7,000 कोटी 
रिलायन्स एचआर सर्व्हिस प्रा. लिमि. 3,369 कोटी 
रिलायन्स कॅपिटल 1,291 कोटी 
रिलायन्स कम्युनिकेशन इंटरप्रायझेस 2,336 कोटी 
रिलायन्स ग्लोबलकॉम 3.75 कोटी 
एलआयसी 4,758 कोटी 
स्टँडर्ड चार्टर्ड बँक 2,130 कोटी 
आयसीबीसी 1,832 कोटी 
सिंडिकेट बँक 1,225 कोटी