आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chinese Boy Who Sold Kidney For An IPhone But Now He Is In Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 वर्षांपूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी विकली होती किडनी, पण आता भोगतोय परिणाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गॅजेट डेस्क : आयफोनच्या किमतीमुळे अनेकवेळा असे म्हटले जाते की, आयफोन खरेदी करण्यासाठी आपली किडनी विकावी लागेल. या गोष्टीला नेहमीच मस्करीत घेतले जाते. पण चीनमधील ताके शाओ वँग या तरूणाने या गोष्टीला खरंच मनावर घेतले होते. याने 7 वर्षांपूर्वी 2011 मध्ये आयफोन खरेदी करण्यसाठी स्वतःची किडनी विकली होती. पण या घटनेला सात वर्ष उलटल्यानंतर वँग आता हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. किडनी विकल्यामुळ त्यांची दुसरी किडनी देखील निकामी झाली आहे. यामुळे तो रूग्णालयात डायलिसिसवर आहे. त्याच्या उपचारासाठी वँगच्या आई-वडिलांना आपले सर्व काही विकावे लागले आहे. 


699 डॉलरचा आयफोन खरेदी करण्यासाठी विकली होती किडनी

शाओ वँगने 2011 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी 699 रूपयांचा आयफोन खरेदी करण्यासाठी ब्लॅक मार्केटमध्ये 3,487 डॉलरला (त्यावेळी अंदाजे 1.74 लाख रूपये) विकली होती. 

 

वँगच्या आईने आयफोन बद्दल विचारपूस केली असता, त्याने किडनी विकल्याची कबूली दिली होती. त्यावेळी या प्रकरणात 5 लोकांना अटक देखील करण्यात आली होती. अटक केलेल्यांनी वँगच्या किडनीची 10 पटीने जास्त किमतीत विक्री केली होती. 

 

आता डायलिसिसवर काढतोय आपले आयुष्य

आयफोनसाठी किडनी विकणे वँगच्या जीवावर बेतले आहे. कारण त्याला आता डायलिसिसवर आपले आयुष्य काढावे लागत आहे. वँगने किडनी विकल्यानंतर चीनच्या एका रूग्णालयात त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण ती अयशस्वी झाल्यामुळे त्याच्या दुसऱ्या किडनीमध्ये संक्रमण झाले आणि त्यामुळे त्याची दुसरी किडनी सुद्धा निकामी झाली. 

 

दुसरी किडनी निकामी झाल्यामुळे वँगचे जगणे कठीण झाले आहे. त्याला आता डायलिसिस मशीवर ठेवण्यात आले आहे. वँगच्या आई-वडिलांकडे आयफोन खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते पण आता वँगच्या उपचारासाठी त्यांना त्यांचे सर्वकाही विकावे लागत आहे.