आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chinese Company Developed Identification System Based On Micro Traits Of Veins Within Human Hand

हातावरील नसांच्या मदतीने अवघ्या 0.3 सेकंदात होईल व्यक्तीची ओळख, चीनी कंपनीने बनवले स्कॅनिंग सिस्टीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- आता हातांच्या नसांच्या मदतीने व्यक्तीची ओळख होईल. चीनी कंपनी मीलक्सने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे फेस रिकग्निशनपेक्षा जास्त वेगवान आणि सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे नवीन तंत्रज्ञान अवघ्या 0.3 सेकंदात हातांच्या नसांच्या मदतीने व्यक्तीची ओळख पटेल. कंपनीने या तंत्रज्ञानाल "एयरवेव" नाव दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे दुसऱ्या बायोमेट्रिक प्रणालीपेक्षा जास्त सुरक्षित आहे.
 

कॅफेटेरिया आणि सार्वजनिक क्षेत्रांपासून सुरुवात
कंपनीने सांगितल्यानुसार, जेव्हा फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाने व्यक्तीची ओळख पटवली जाते, तेव्हा चेहऱ्यावरील 80 ते 280 फीचर पॉइंट्सचा तपास होतो. पण एयरवेव 0.3 सेकंदात हातावरील एक मिलियनपेक्षा जास्त मायक्रो-फीचर पॉइंट्सला स्कॅन करेल. यामुळे दुसरा कोणी तुमची ओळख घेऊन तुमच्या जागेवर जाऊ शकत नाही.
चीनमध्ये सध्या बहुतेक काम कॅशलेस आणि फेस रिकग्निशन तंत्ररज्ञानाच्या मदतीने केली जाते. चीनमध्ये बहुतेक जागांवर चेहऱ्याची ओळख, क्यूआर कोड आणि पासवर्ड सिस्टीमचा वापर केला जातो.