Home | Khabrein Jara Hat Ke | Chinese company online leaked nude selfies of girls mortgaged against loan

कर्ज चुकवले नाही म्हणून 150 मुलींचे Nude selfie केले ऑनलाइन लीक, चीनमधील कंपनीचा प्रताप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

कर्ज वेळेत फेडले नाही तर हे फोटो त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये लीक केले जाईल असे सांगितले जाते.

 • Chinese company online leaked nude selfies of girls mortgaged against loan

  बीजिंग - कर्ज फेडले नाही म्हणून चीनच्या एका कंपनीने 150 मुलींची न्यूड सेल्फी ऑनलाइन लीक केले आहेत. चीनमध्ये ही कंपनी तरुण मुलींना कर्ज देण्यासाठी तारण म्हणून त्यांचे न्यूड सेल्फी घेत असते. कर्ज वेळेत फेडले नाही तर हे फोटो त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये लीक केले जाईल असे सांगितले जाते. त्यामुळेच या तरुणींचे फोटो लीक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

  तारण म्हणून घेतात न्यूड फोटो...
  या कंपन्या प्रामुख्याने तरुणींना ऑनलाईन स्वरुपात कर्ज देते. त्यासाठी कुठल्याही रांगेत उभे राहण्याची किंवा एजंट पकडण्याची गरज नसते. ऑनलाईन अर्ज देऊन आपल्या मोबाईल बँकेतही पैसा मिळवता येतो. परंतु, यासाठी त्यांना गॅरंटी म्हणून स्वतःचे न्यूड फोटो कंपनीकडे गहाण ठेवावे लागतात. हे फोटो काढताना तरुणींना हातात आपल्या आयडी कार्ड आणि कर्जाच्या तपशीलासह पोझ द्यावे लागतात. जोपर्यंत कर्जाची परतफेड होणार नाही तोपर्यंत फायनान्स कंपनी हे फोटो स्वतःकडे ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत असते.


  कारवाई ऐकूण बसेल धक्का...
  ही कंपनी कर्जाचा हप्ता चुकवल्यास किंवा निश्चित वेळेच्या आत परतफेड न झाल्यास त्या फोटोंचा वापर करतात. सुरुवातीला तरुणींना त्यांचे फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. तरीही परतफेड होत नाही, तेव्हा ही कंपनी त्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करते. केवळ फोटो व्हायरल करून ते थांबत नाहीत. कंपनीकडे कर्ज घेणाऱ्या मुलींचे आई-वडील, नातेवाइक, काका-मामा आणि भाऊ-बहिणींसह मित्र-मैत्रिणींचेही नंबर असतात. त्या सर्वांना कपंनी हे नग्न फोटो त्या मुलींच्या सविस्तर माहिती आणि पत्त्यासह पाठवतात.


  प्रचंड व्याजदर
  या कंपनीकडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदरही अत्यंत जास्त आहे. जवळपास महिन्याला 27 टक्के एवढ्या व्याजाने या कर्जाची रक्कम वाढते. त्यामुळे अनेकांना लोन फेडणे सहज शक्य होत नाही. एका तरुणीने तर 80 डॉलरच्या मोबदल्यात 9000 डॉलर कंपनीला दिल्याचे सांगितले.

 • Chinese company online leaked nude selfies of girls mortgaged against loan
 • Chinese company online leaked nude selfies of girls mortgaged against loan
 • Chinese company online leaked nude selfies of girls mortgaged against loan

Trending