आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
शिजियाजुआंग- चीनच्या एका बँकेवर सध्या लोकांनी टीकेचा भडिमार केला आहे. या बँकेने त्यांच्या एका महिला कर्मचारीला अबॉर्शन किंवा पेनल्टी भरण्याचे आदेश दिले आहेत. त्या महिलेची चुक इतकीच झाली की, ती बॉसला न विचारता गरोदर झाली. अनेक महिलांसोबत अश्या घटना घडल्या आहेत.
वर्षाच्या सुरूवातीलाच भरावा लागतो फॉर्म
- हा विचित्र नियम चीनच्या शिजियाजुआंग राज्यातल्या एका बँकेचा आहे. त्या बँकेत बॉसच्या परवानगी शिवाय महिलांना गरोदर होता येत नाही. बँकेने त्यांच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून तसा फॉर्मच भरून घेतला आहे.
- बँकेच्या पॉलिसीनुसार जर एखाद्या महिलेला गरोदर व्हायचे असेल तर तिला जानेवारी महिन्यातच फॉर्म भरावा लागेल आणि बॉसने होकार दिल्यावरच तिला गरोदर होता येईल.
- जर एखाद्या महिलेने हा नियम मोडला तर तिला अबॉर्शन करावे लागेल किंवा पेन्ल्टी भरावी लागेल.
- बँकेची ही विचित्र 'प्रेग्नेंसी पॉलिसी' जगासमोर तेव्हा आली जेव्हा येथील एका महिलेने शिजियाजुआंग एंप्लॅाय सर्विस सेंटरमध्ये या प्रकरणात मदत मागितली.
महिलेच्या तक्रारीनंतर बँकेवर झाली अॅक्शन
- त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती परवानगी विना गरोदर झाली त्यामुळे आता तिला अबॉर्शन किंवा पेन्ल्टी यापैकी एकाची निवड करावी लागत आहे, त्यासोबतच तिने हेही सांगितले की, याआधीही अनेक महिलांसोबत असे घडले आहे.
- चीनच्या कुटूंब नियोजन नियमानूसार महिलांचे प्रजनन अधिकार कायद्याद्वारे संरक्षित आहेत, आणि तेथे कपल फक्त दोनच मुलांना जन्म देउ शकतात. पण गरोदर झालात म्हणुन सॅलरी कमी करण्याचा नियम नाहीये.
- महिलाच्या तक्रारीनंतर शिजियाजुआंग एंप्लॅाय सर्विस सेंटरने बँकेसोबत मीटींग घेऊन त्यांच्या प्रेग्नेंसी पॉलीसीला लगेच बंद करण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.