• Home
  • Chinese fisherman has survived after 11 days adrift in the 'Bermuda Triangle of Asia'

International Special / आशियातील बरमुडा ट्रायअँगलमध्ये 11 दिवस अडकला 52 वर्षीय मासेमार, स्वतःचे मुत्र पिऊन राहीला जिंवत


पिंगटन क्षेत्रात पेट्रोल संपल्यामुळे त्यांची बोट वाहून गेली होती

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 02:18:00 PM IST

बीजिंग- अत्यंत धोकादायक असलेल्या बरमुडा ट्रायअँगलमधून एखादा व्यक्ती सुखरूप बाहेर येणे हे एखाद्या चमत्कारपेक्षा कमी नाही. चीनी मच्छीमार नियान सिंघूआ 11 दिवस समुद्रात अडकल्यानंतर सुरक्षित घरी पोहचले आहेत. चीनी मीडियानुसार, नियान हे चीनच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीपासून 63 किलोमीटर पिंगटनमध्ये 10 मेपासून अडकलेले होते. यादरम्यान जिंवत राहण्यासाठी त्यांना आपले मुत्र प्यावे लागले आणि माशांसाठी आणलेला चारा खावा लागला. नियान यांना 11 दिवसांनी एका कार्गो शिपच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले.

नियान 10 मे रोजी मासे पकडताना समुद्रात भटकले. यादरम्यान जोरदार हवा, समुद्री प्रवाह आणि थंडीमुळे त्यांची पेट्रोल बोट अशियाच्या बरमूडा ट्रायअँगलमध्ये अडकली. 36 वर्षापासून मासेमारी करणाऱ्या नियानने आपला प्रवास उत्तर पूर्व किंग्दाओ बंदरावरून सुरू केला होता. तसेच, नियान यांच्या पत्नीने सांगितले की, आम्ही त्यांची जिवंत असल्याची उमेद सोडून दिली होती. पण नियानचे परत येणे आमच्यासाठी एखाद्या चमत्काराप्रमाणे आहे.

बरमुडा ट्रायअँगलमध्ये बेपत्ता झाले आहेत अनेक जहाज
आशियाच्या बरमूडा ट्रायँगलमध्ये 2016 मध्ये 85 जहाज बेपत्ता झाले होते. त्यामुळे दक्षिण चीन सागराच्या समुद्री भागाला जापान, फिलीपीन्स आणि इंडोनेशिया या देशांनी आशियाचे बरमूडा ट्रायअँगल घोषित केले होते. वास्तविक बरमूडा ट्रायअँगल उत्तर अटलांटिक महासागरचा भाग आहे. तसेच याला 'डेव्हिल्स ट्रायअँगल' असे सुद्धा म्हटले जाते.

X
COMMENT