आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायनीज फूड खात असाल, तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल प्रत्येक ठिकाणी चायनीज फूड मिळते. अनेक लोक रोड रस्त्याच्या कडेच्या शॉपमधून किंवा आजुबाजूच्या चायनीज हॉटेल्समधून चायनीज फूड खातात. भारतात तयार होणारे चायनीज फूड हे खूप मसालेदार असते. आपल्या येथील चायनीज फूडमध्ये जे पदार्थ टाकले जातात, ते जास्त प्रमाणात घेतल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते... 


चायनीज फूड खाण्यापूर्वी लक्षात ठेवा... 
1. एमएसजीने होते नुकसान 

चायनीज फूडमध्ये टाकले जाणारे सोडियम ग्लुटामेट किंवा एमएसजी याला सामान्य भाषेत अजिनोमोटो म्हटले जाते. हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. यामुळे जास्त खाऊ नका. 


2. बीपीच्या पेशेट्सने टाळावे 
यामध्ये खूप जास्त मीठ असते. भारतीय पदार्थांच्या तुलनेत यात ४० टक्के जास्त सोडियम असल्याने रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना ते हानिकारक ठरू शकते. 


3. जास्त कार्बोहायड्रेट्स 
चायनीज फूड्समध्ये मैद्याचे नूडल्स आणि तांदुळाचा जास्त वापर होतो. हे हाय कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ अपचन, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या समस्या निर्माण करू शकतात. 


4. एपोटायजर्स आणि सूप घ्या 
चायनीज फूड खाण्यापूर्वी सूप आणि एपोटायजर्स घ्या. हे एक चांगला पर्याय ठरते. यामुळे आपण जास्त हेवी फूड घेणे टाळू शकतो. 


5. सॉसचा मर्यादित वापर 
चायनीज सॉस म्हणजेच सोया सॉस, होयसिन यांमध्ये मीठ आणि साखर जास्त प्रमाणात असते. यामुळे याचा कमी वापर करा. 


6. डिश निवडताना : ज्या चायनिज डिशमध्ये जास्त पाालेभाज्यांचा वापर केला असेल तीच डिश निवडा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...