आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिर्घकाळापासून व्यक्तीला डोकेदुखीचा होत होता त्रास, तपासणी नंतर डोक्यात जे निघाले ते पाहून डॉक्टर झाले चकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग. चीनमध्ये एका व्यक्तीला गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखीची समस्या होत होती. त्याच्या वेदना वाढल्या तेव्हा तो उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. डोकेदुखीचे कारण जाणुन घेण्यासाठी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा कळाले की, त्याच्या डोक्यात जवळपास 5 सेंटीमीटर लांब खिळा आहे. याविषयी त्याला माहिती नव्हती. हा खिळा त्याच्या डोक्यात कसा गेला याविषयीही त्याला माहिती नव्हती. 


डोक्यात मिळाला 5 सेंटीमीटर लांब खिळा 
- ही स्टोरी चीनच्या हुबेई प्रांताच्या चोंगयांगमध्ये राहणा-या हू नावाच्या व्यक्तीची आहे. तो सीमेंट फॅक्ट्रीमध्ये सुपरवाइजरचे काम करतो. हू सांगतो की, त्याला गेल्या ब-याच दिवसांपासून डोकेदुखीची समस्या होती. परंतु त्याचा त्रास नुकताच खुप वाढला तर तो उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. 
- त्याच्या वेदनांमागचे कारण जाणुन घेण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे CT स्कॅन केले, तेव्हा त्याचे रिपोर्ट पाहून ते हैराण झाले. त्याच्या डोक्यामध्ये डाव्या बाजूला 4.8 मिलीमीटर लांब एक खिळा होता. 
- हा खिळा डोक्यात कसा गेला, याविषयी त्याला जराही कल्पना नव्हती. तो म्हणतो की, "हा खिळा माझ्या डोक्यात कसा गेला मला माहित नाही, फॅक्ट्रीमध्ये लावलेल्या सिक्यूरिटी कॅमेरांची देखरेख करणे हे माझे काम आहे आणि या कामासाठी मला खिळ्याचा वापर करण्याची काहीच गरज पडत नाही."
- डॉक्टर्सने सर्जरीसाठी हूला वुहान जाऊन ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. 

बातम्या आणखी आहेत...