आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर 3 वर्षे मातीच्या डब्यात बंद ठेवला मृतदेह, मग बाहेर काढून चढवला सोन्याचा थर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'मेडिकल सायन्स सिरीज' अंतर्गत आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी संबंधित अशा अनेक रिअल लाइफ शॉकिंग स्टोरीज आहेत, ज्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत.)


बीजिंग - मृतांना ममी बनवण्याची प्रथा फक्त इजिप्तमध्ये होती, असा तुम्ही विचार केला असेल तर चीनच्या या बौद्ध भिक्षूची कहाणी तुम्हाला नक्कीच चकित करणारी ठरेल. या बौद्ध भिक्षूंच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह सोन्याने मढवण्यात आला. यानंतर ही डेड बॉडी आजही सुरक्षित आहे. बौद्ध भिक्षू फू होऊ यांचे निधन 94 वर्षे वयात 2012 मध्ये झाले होते. यानंतर 3 वर्षांपर्यंत त्यांना मातीच्या एका विशाल भांड्यात बंद ठेवण्यात आले होते. 

 

मंदिरात आहे मृतदेह...
- बौद्ध मठाकडून ली रेन म्हणाले की, भिक्षू फू होऊ यांनी आयुष्यातील बहुतांश वेळ दक्षिण-पूर्व चीनच्या क्वानझाऊ शहरातील चोंगफू मंदिरात घालवला. बौद्ध परंपरांचे पालन करणाऱ्या भिक्षूंचा सन्मान म्हणून त्यांना सोन्याचा लेप त्यांच्या देहावर लावण्यात आला आहे.

 

फक्त पवित्र व्यक्तींवरच टिकून राहते सोने
सोन्याने मृत शरीराला आच्छादित करण्यावरून विविध मान्यता आहेत. हा सन्मान प्रत्येकालाच मिळतो असे नाही, परंतु असे मानले जाते की, या पूर्ण प्रक्रियेत सोने त्याच शरीरावर टिकते, ज्यांची आत्मा पवित्र होती. अन्यथा सोने शरीरावरून घसरून पडते.

 

17 वर्षे वयातच स्वीकारला बौद्ध धर्म
फू होऊ यांनी फक्त 17 वर्षे वयात बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीर्घ काळापर्यंत धर्मासाठी आस्था बाळगून आणि प्रसार करण्यात योगदान दिल्याने त्यांना हा सन्मान देण्यात आला.

 

मृत्यूनंतर लगेच घातली अंघोळ
रेन म्हणाले की, मृत्यूनंतर लगेचच भिक्षूंच्या पार्थिवाला स्नान घालण्यात आले. दोन ममी एक्सपर्ट्सनी त्यांच्या शरीरावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. मग त्यांना बसलेल्या अवस्थेतच अनेक प्रकारच्या केमिकलने अंघोळ घालण्यात आली. चिनी मातीच्या एका मोठ्या पात्रात देह ठेवून ते बंद करण्यात आले.

 

3 वर्षे मातीच्या पात्रात बंद होता देह
रिपोर्ट्सनुसार, 3 वर्षांनंतर जेव्हा मातीचे पात्र उघडण्यात आले, तेव्हा भिक्षूंचा मृतदेह सुस्थितीत आढळला. फक्त त्यांच्या शरीराची त्वचा आक्रसून गेलेली होती.

 

असे चढवले सोने
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भिक्षूंच्या शरीराला आधी अल्कोहोलने अंघोळ घालण्यात आली. मग त्यावर एक जाळीदार पातळ कापड लपेटण्यात आले. यानंतर त्यावर एक केमिकलचा थर चढवण्यात आला. मग शेवटी त्यावर सोन्याचा वर्ख चढवण्यात आला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...