आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन चांद्रवर्षानिमित्त 40 देशांत 100 काेटी लोक करताहेत प्रवास 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग | जगातील दुसऱ्या सर्वात माेठ्या चिनी नूतन चांद्रवर्ष सणाला प्रारंभ झाला अाहे. हा उत्सव १४ दिवस चालेल. यास (लुनर) 'स्प्रिंग फेस्टिव्हल' नावाने अाेळखले जाते. चीनसह जगातील सुमारे ४० देशांतील जवळपास ३ अब्ज लोक हा सण साजरा करत अाहेत. या देशांत जगातील सुमारे ३० % लाेक राहतात. त्यापैकी १४० काेटी म्हणजे १९ % लोक चीनचे अाहेत. लुनर फेस्टिव्हलमध्ये १ अब्जहून जास्त नागरिक एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. त्यातील बहुतांश जण त्यांच्या होम टाऊनमध्ये जाणारे अाहेत. जगात एकाच वेळी इतक्या माेठ्या संख्येत लाेक काेठेही प्रवास करत नाहीत. एकट्या चीनमध्ये सुमारे ५० ते ५५ काेटी लोक देशांतर्गत प्रवासावर अाहेत. हे प्रमाण गत उत्सवापेक्षा ४ % जास्त अाहे. यंदा ७० लाख चिनी नागरिक विदेशात प्रवास करत असून, ही संख्या मागील वर्षापेक्षा ८ % अधिक अाहे. इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी नागरिक १२५ काेटी किमीहून जास्त प्रवास करतील. हे अंतर पृथ्वी ते शनी ग्रहाएवढे अाहे. 

 

चीनमध्ये यंदा ४० दिवसांत विविध वाहने मारतील ३५ लाख फेऱ्या 
वाहन फेऱ्या 
दुचाकी 12 लाख 
कार/बस 14 लाख 
जहाज 1 लाख 
रेल्वे 2 लाख 
बुलेट ट्रेन 20 हजार 
विमान 4 लाख 


40 काेटी लोकांचा रेल्वेतून प्रवास. 

6 काेटी लोकांचा विमानातून प्रवास 
5 ते ८ काेटी लोक प्रवासासाठी घेतील इतर साधनांची मदत. 

 

रोज दर सेकंदास रेल्वेतून १०० लोक प्रवासावर 
चीनमध्ये १.२७ लाख किमी लांब रेल्वेचे जाळे असून २५ हजार किमीचे बुलेट ट्रेन नेटवर्कही अाहे. हे जगातील सर्वात माेठे रेल्वे नेटवर्क अाहे. चीनच्या ३१ पैकी २९ राज्यांत बुलेट ट्रेनचे नेटवर्क. 

बुलेट व इतर रेल्वेगाड्यांत ४० दिवस रोज दर सेकंदास १०० लोक प्रवासावर. 
यासाठी तेथे १३ हजार कॉल सेंटर असून तेथील १९ लाख ऑपरेटर लोकांची प्रवासाबाबत मदत करताहेत. हा सण मुख्यत्वे चीन, हांॅगकांॅग, मकाऊ, तैवान, उ. व द. कोरिया, जपान, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपाइन्स आदी देशांत साजरा हाेताेय.
 

बातम्या आणखी आहेत...