आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cyborg Rat: मानवी मेंदूने उंदरांना नियंत्रित करण्यात यश; बचावकार्यांमध्ये पडणार उपयोगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - चिनी संशोधकांनी उंदरांना मानवी मेंदूच्या माध्यमातून नियंत्रण करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणूस आपल्या विचारांनी उंदिराला एखाद्या रोबोटप्रमाणे हाताळू शकतो असे या प्रयोगातून सिद्द झाले आहे. संशोधकांनी हा प्रयोग वायरलेस ब्रेन-टू-ब्रेन सिस्टिम बनवून केला. ही यंत्रणा उंदराच्या मेंदूमध्ये बसवण्यात आली होती. त्यामुळे, अशा उंदराला 'सायबॉर्ग उंदिर असे नाव देण्यात आले आहे. भूकंप किंवा नैसर्गिक संकटानंतर बचाव करत असताना अशक्य ठिकाणी अशा उंदिरांना पाठवून त्यांची मदत घेतली जाऊ शकते.


चिनी संशोधकांचा हा सिद्धांत 'रॅट सायबॉर्ग प्रिपरेशन' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रेन-टू-ब्रेन इंटरफेस (BBI) संदर्भात बोलताना संशोधक म्हणाले, ही यंत्रणा उंदराच्या मेंदूला जोडून संगणकाशी कनेक्ट केली जाते. यानंतर उंदिराचा मेंदू आणि एकूण तो उंदिर मानवी मेंदूच्या विचारांनी नियंत्रित केले जाते. वैज्ञानिकांनी उंदराच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या पाठीच्या कण्यात इलेक्ट्रोड लावले. यानंतर इलेक्ट्रोड वायरलेस पद्धतीने उंदराच्या मेंदूपर्यंत जोडले होते. प्रयोगात उंदराला एका चक्रव्यूहात टाकण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी एका माणसाला बसवण्यात आले. त्याच्या डोक्यावर सुद्धा इलेक्ट्रो एन्फेलोग्राम (ईईजी) लावले होते. याच माध्यमातून तो उंदिराला नियंत्रित करत होता. या दोघांच्या मेंदूला लावलेली यंत्रणा संगणकाशी जोडलेली होती. अर्थात कंप्यूटर त्या दोघांना जोडणाऱ्या आणि सिग्नल पास करणाऱ्या माध्यमाचे काम करत होते. याच लहरी आणि सिग्नलच्या माध्यमातून उंदराला दिशा दाखवली जात होती.


6 उंदरांवर यशस्वी प्रयोग
चीनच्या संशोधकांनी केवळ एक नव्हे, तर अशाच पद्धतीने 6 उंदरांवर प्रयोग करून सर्वांना नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे. त्या सर्वच उंदरांना दिशा दाखवून कोडे सोडवण्यात आणि योग्य ठिकाणी नेऊन पोहोचविण्यात 90 टक्के यशस्वी झाल्याचे जर्नलमध्ये लिहिण्यात आले आहे. आता या उंदरांवर कॅमेरे आणि वॉकी टॉकी लावून विविध प्रयोग केले जाणार आहेत. भूकंप किंवा नैसर्गिक संकटात बचावकार्य करत असताना प्रत्येक ठिकाणी माणसांना पोहोचणे शक्य नाही. अशावेळी उंदरांवर कॅमेरे लावून त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकते. अशा उंदिरांमुळे बचावकार्यात गती येईल असे सांगितले जात आहे.
 

बातम्या आणखी आहेत...