आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऱ्या जगाला मोफत मिळणार हायस्पीड WiFi इंटरनेट; 2026 पासून सुरुवात, जाणून घ्या कसे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - नेहमीच काही वेगळे आणि विचित्र करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनचा आणखी कारनामा समोर आला आहे. कृत्रिम चंद्रावर काम सुरू करणाऱ्या चीनने आता साऱ्या जगाला मोफत इंटरनेट वाटप करण्याची तयारी सुरू केली आहे. याच अंतर्गत चीनची एक कंपनी असे उपग्रह अंतराळात स्थापित करणार आहे. ज्या उपग्रहाच्या माध्यमातून जगात कुठेही कुणालाही अगदी मोफत वाय-फाय इंटरनेट वापरता येईल.


2019 मध्ये याच दिशेने चिनी कंपनी आपले उपग्रह अंतराळात स्थापित करणार आहे. लिंक श्योर नेटवर्क असे या कंपनीचे नाव असून त्यांनी उपग्रह चीनच्या पश्चिमोत्तर परिसरातील गांसू प्रांतातून प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीच्या नियोजनाप्रमाणे 2020 पर्यंत त्यांचे 10 उपग्रह अंतराळात स्थापित केले जातील. यानंतर 2027 पर्यंत सर्वच 272 उपग्रह स्थापित होतील. तेव्हापासूनच साऱ्या जगाला उपग्रहांच्या माध्यमातून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.


चीनचे सरकारी दैनिक पीपल्स डेलीमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेण्यासाठी लोक मोबाईलचा देखील वापर करू शकतील. लिंक श्योरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वांग जिंगयिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, कंपनी या प्रकल्पासाठी 3 अब्ज युआन अर्थात 300 अब्ज रुपयांची गुंतवणूक करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...