ट्रेलर रिलीज / स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणा-या कोणत्याही सैतानाची फते होऊ द्यायची नाही....,  ‘फत्तेशिकस्त’चा दमदार ट्रेलर रिलीज 

या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती.
मंचावर चित्रपटातील कलाकार मंचावर चित्रपटातील कलाकार

ट्रेलर रिलीजवेळी अवघी मराठेशाही अवतरली !!

Oct 11,2019 05:27:35 PM IST

'फर्जंद' या ऐतिहासिक चित्रपटात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्त' या आगामी मराठी चित्रपटात स्वराज्यातील पहिला 'सर्जिकल स्ट्राइक' पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधून शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांची कुशल युद्धनीती आणि त्यांच्या सैन्यानाने त्यांना युद्धात दिलेली साथ स्पष्टपणे दिसून येत आहे.

..... आणि अवघी मराठेशाही अवतरली !!
ट्रेलर रिलीजवेळी भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ आणि त्यासोबत मराठेशाहीतील एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिरेखांचा रंगमंचावरचा अविष्कार बघायला मिळाला. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती. चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला.

यूट्युबवर ट्रेंडिगमध्ये आहे ट्रेलर...
चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस पडला आहे. यूट्युब ट्रेंडिगमध्ये टॉप 10मध्ये ट्रेलरने स्थान पटकावले आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करुन याची माहिती दिली.

Among top 10 trending on Youtube. #Fatteshikast #15Nov

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar) on


दमदार कलाकारांची फौज...
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. येत्या 15 नोव्हेंबर रोजी 'फत्तेशिकस्त' प्रदर्शित होणार आहे.

X
या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती.या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती.
मंचावर चित्रपटातील कलाकारमंचावर चित्रपटातील कलाकार