आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणा-या कोणत्याही सैतानाची फते होऊ द्यायची नाही....,  ‘फत्तेशिकस्त’चा दमदार ट्रेलर रिलीज 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फर्जंद' या ऐतिहासिक चित्रपटात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्त' या आगामी मराठी चित्रपटात स्वराज्यातील पहिला 'सर्जिकल स्ट्राइक' पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला.  ट्रेलरमधून शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांची कुशल युद्धनीती आणि त्यांच्या सैन्यानाने त्यांना युद्धात दिलेली साथ स्पष्टपणे दिसून येत आहे.

..... आणि अवघी मराठेशाही अवतरली !!
ट्रेलर रिलीजवेळी भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ आणि त्यासोबत मराठेशाहीतील एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिरेखांचा रंगमंचावरचा अविष्कार बघायला मिळाला. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघी शिवशाही रंगमंचावर अवतरली होती. चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला.

यूट्युबवर ट्रेंडिगमध्ये आहे ट्रेलर... 
चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस पडला आहे. यूट्युब ट्रेंडिगमध्ये टॉप 10मध्ये ट्रेलरने स्थान पटकावले आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करुन याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...