आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिटफंड घाेटाळ्यावर मोदी VS ममता :शहरातील सीबीआय कार्यालय घेतले राज्य पोलिसांनी ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील तणावामुळे रविवारी रात्री कोलकात्यात घटनात्मक पेचासारखी परिस्थिती निर्माण झाली. सारदा व रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी दाखल झालेल्या सीबीआयच्या ४० अधिकाऱ्यांना सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेत जीपमध्ये कांेबले. नंतर ठाण्यात तीन तास ताटकळत ठेवले. तणाव वाढल्यावर रात्री उशिरा या भागात केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले. दुसरीकडे सीबीआय कार्यालयावर पोलिसांनी ताबा घेतला. पोलिसांना सीबीआय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत की नाहीत, यावरून राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला. 

 

गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला प. बंगालने दिल्ली पोलिस एस्टॅब्लिशमेंट कायद्यानुसार सीबीआयला राज्यात चौकशीसाठी दिलेली सहमती मागे घेतली होती. त्यामुळे आता राज्यात सीबीआयला थेट कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. 

 

पाेलिसांना अधिकार... 
पोलिस एस्टॅब्लिशमेंट कायद्याला ममता बॅनर्जी यांनी असहमती दर्शवल्यानंतर सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बंगालमध्ये कारवाई करण्याचा अधिकार नाही. यामुळे पोलिस सीबीआयला राेखू शकतात. परंतु, पकडून ठाण्यात ठेवणे चुकीचे आहे. - पी. डी. टी. अचारी, घटनातज्ज्ञ 

 

कोर्टात जायला हवे होते 
सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी पकडणे चुकीचेच आहे. मात्र, सीबीआयनेही अशा कारवाईपूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यायला हवी होती. थेट राज्य सरकारला भिडण्यापेक्षा सीबीआयने कोर्टातून याची परवागनी मिळवली असती तर हा तणाव निर्माण झाला नसता. - एस. पी. सिंह, सीबीआयचे माजी संचालक 

 

कायदेशीर पर्याय काय? 
१. कोलकाता हायकोर्ट या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊ शकते. पोलिस व सीबीआयचे अधिकार हायकोर्टच निश्चित करेल. 
२. केंद्र प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकते, असे घटनातज्ज्ञ डॉ. आदिश चंद्र अग्रवाल म्हणाले. 

 

प्रकरण काय? : चिटफंड घोटाळ्याच्या चौकशी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त राजीव कुमार बेपत्ता आहेत. गहाळ फाईल, दस्तऐवजांबाबत सीबीआयला चौकशी करावयाची होती. मात्र, याचे वॉरंट नव्हते. 

 

पुढे काय? : सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार, राहुलसह विरोधक केंद्राविरुद्ध देशपातळीवर एकटवणार 

 

हा तर सत्ता उलथवून टाकण्याचा कट : ममता बॅनर्जी 
प. बंगाल पोलिसांनी सीबीआय पथकातील अधिकाऱ्यांना असे पकडून जीपमध्ये कोंबले आणि ठाण्यात तीन तास डांबून ठेवले. 


ममतांचा हल्लाबोल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांचा राज्यातील तृणमूलची सत्ता उलथवण्याचा हा डाव असल्याचे सांगत केंद्र व सीबीआयच्या निषेधार्थ धरणे धरले. 

 

बातम्या आणखी आहेत...