आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chitrangada Singh Who Faced Molestation On The Sets Of Babumoshai Bandookbaaz Supports Tanushree Dutta

दोन वर्षांपूर्वी या अभिनेत्रीचा झाला होता सेटवर लैंगिक छळ, तनुश्रीच्या समर्थनार्थ म्हणाली, माझा तिच्यावर विश्वास आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 2008मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नानांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने लावला होता. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा सविस्तर उल्लेख तनुश्रीने अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. आता तिला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळतोय. अभिनेत्री चित्रांगदा सिंगने तनुश्रीचे समर्थन केले आहे. divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदा म्हणाली, "माझा तिचा पूर्ण विश्वास असून माझा तिला पाठिंबा आहे." 


दोन वर्षांपूर्वी चित्रांगदासोबत घडली होती अशीच एक घटना... 
- दोन वर्षांपूर्वी चित्रांगदा सिंगसोबत सेटवर अशीच घटना घडली होती. दिग्दर्शक कुशान नंदी (निर्माते प्रीतिश नंदींचा मुलगा) च्या  'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटाच्या सेटवर चित्रांगदसोबत ही घटना घडली होती. त्यावेळी लखनऊमध्ये शूटिंग सुरु होते. चित्रांगदा नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट चित्रपटात होती. पण सहा दिवसांच्या शूटिंगनंतर तिने हा चित्रपट सोडला होता. कुशान नंदीने चित्रांगदाकडे नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सेक्स सीनची मागणी केली होती. त्यामुळे ती सेटवरुन रडत रडत निघून गेली होती. 

 

काय घडले होते... 
चित्रांगदाने एका मुलाखतीत सांगितले होते, 'मी शॉट संपवला, तेव्हा कुशान म्हणाला मला हा शॉट आवडला नाही. त्याला माझ्याकडून सेक्स सीन हवा होता. हा सीन मला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत द्यायचा होता. कुशानची इच्छा होती, की मी नवाजच्या अंगावर झोपावे. मी त्या सीनदरम्यान पेटीकोट परिधान केलेला होता. मी माझी अवस्था त्याला समजावून सांगितली. मी त्याला म्हणाले, 'झाले तर आहे, असे का करतोय? प्लीज समजून घे, मी पेटीकोट परिधान केलाय. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यादरम्यान आमचा वाद झाला. काही मिनीटानंतर नवाज माझ्याकडे आले आणि म्हणाले, की इंटीमेट सीन चांगला शूट झाला.'

 

चित्रांगदाने पुढे सांगितले होते, की शॉट पूर्ण झाल्यानंतर कुशानने तिला म्हटले, की बिनधास्त महिलेसारखा सीन पूर्ण कर. ती सांगते, 'मी त्याला म्हणाले बिनधास्त महिला काय असते? ती पेटीकोट परिधान करून एका पुरुषाच्या अंगावर झोपते? कुशानने या गोष्टीवर वाद घातला, की माझे पात्र अशा महिलेचे आहे, जी बेडवर वाइल्ड आहे. वाइल्ड होण्याचा अर्थ असा होता, की ती कधीही पतीला पाहिल्यानंतर सेक्सची मागणी करते.' 

 

कुशानला हवा होता स्मूच सीन... 
चित्रांगदाने मुलाखतीत सांगितले, की कुशानला तिच्या आणि नवाजमध्ये 7 सेकंदाचा स्मूच सीन हवा होता. ती सांगते, 'आम्ही एक मोंटाज शूट केला होता. तसेच काहीसे कुशानला येथे हवे होते. नवाज आणि मी मोंटाजसाठी किस सीन दिला होता आणि आता कुशानची इच्छा होती, की इंटीमेट सीनसाठीसुध्दा 7 सेकंदाचा स्मूच सीन हवा. नवाजसुध्दा त्याला म्हणाले होते, की किस तर केलंय आता आणखी काय हवंय कुशान."


बिदिता बागने केले होते चित्रांगदाला रिप्लेस 
- मॉडेल आणि अभिनेत्री बिदिता बागने चित्रपटात चित्रांगदाची जागा घेतली होती. चित्रांगदाविषयी सांगायचे म्हणजे 'बाबूमोशाय...' सोडल्यानंतर तिने 'मुन्ना माइकल' (2017) मध्ये कॅमिओ केला होता. तर 'सूरमा' (2008) या चित्रपटाची निर्मिती केली होती. याचवर्षी ती संजय दत्त आणि जिमी शेरगिल स्टारर 'साहब बीवी और गँगस्टर 3'मध्ये झळकली होती. 

बातम्या आणखी आहेत...