आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मिती क्षेत्रानंतर आता फूड शोमध्ये झळकणार चित्रांगदा सिंह , या कारणामुळे झाली निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. निर्मिती क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केल्यानंतर अभिनेत्री चित्रांगदा सिंह आता एका फूड शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एएक्सएन (AXN) या वाहिनीवर ऑक्टोबरपासून हा शो प्रसारित होणार आहे.

 

मेरिएट इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी आदरातिथ्‍य शृंखला आणि एएक्‍सएन इंडिया (AXN India) या शोसाठी एकत्र आले आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून या पाककला कार्यक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

 

चित्रांगदाने आहारविषयातली संपादन केलेली पदवी, अभिनेत्री म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करत तिला या शोसाठी निवडण्यात आलं. याविषयी चित्रांगदा म्हणाली, ‘आपल्या जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेरिएटचे शेफ अगदी आगळ्यावेगळ्या चवीचे पदार्थ बनवतात. मला नेहमीच पाककला, आपली संस्‍कृती आणि जगभरात प्रवास करण्‍याबाबत रुची राहिली आहे. याच आवडीने मला विविध पदार्थांचा स्‍वाद घेण्‍याची संधी दिली आहे.’

 

बातम्या आणखी आहेत...