Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Choose write candidate in 2019 election : Advt Prakash Ambedkar

जात-धर्म-पक्ष बघू नका; कर्तृत्व बघून मतदान करा ; अॅड. आंबेडकरांचे औरंगाबादेतील मतदारांना आवाहन

प्रतिनिधी | Update - Apr 20, 2019, 09:23 AM IST

साध्वींच्या वक्तव्याचा ओवेसींनी केला निषेध

  • Choose write candidate in 2019 election : Advt Prakash Ambedkar

    औरंगाबाद - उमेदवाराची जात-धर्म आणि पक्षही बघू नका. त्याचे कर्तृत्व बघून मतदान करा. म्हणजे मतपेटीतून कुटुंबशाही मुक्त होऊन परिवर्तन घडेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केले. वंचित बहुजन अाघाडी-एमअायएमचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जबिंदा लाॅन्स येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे नेते बॅ‌. असदुद्दीन ओवेसी उपस्थित हाेते.


    आंबेडकर म्हणाले, ‘आज अशी परिस्थिती आहे की, कुणालाच अंदाज बांधता येत नाही. ही निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.’ सर्व जाती-धर्माच्या मतदारांनी इम्तियाज यांना मतदान करण्यासाठी पुढे यावे. निवडणूक आयोगाने मतदार स्लिप देण्यासाठी एजन्सी नियुक्त केली. मात्र, पहिल्या दोन टप्प्यांतील मतदारांना स्लिप मिळाली नसल्याने ४ टक्के मतदान कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. नांदेडमध्ये अशाेकराव चव्हाण यांच्याविरुद्ध आपले यशपाल भिंगे आजच निवडून आले आहेत, असा विश्वास अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.

    साध्वींच्या वक्तव्याचा निषेध
    असदुद्दीन ओवेसी यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाेरदार टीका केली. माेदी प्रत्येक भाषणात सैनिकांचा विषय काढून भावनेच्या आधारे मते मागत आहेत. दुसरीकडे त्यांनी मालेगावात बॉम्बस्फोट घडवल्याचा अाराेप असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून उमेदवारी दिली. अापल्या शापामुळे शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला, असे या साध्वी म्हणतात. निधड्या छातीचे पोलिस अधिकारी हेमंत करकरे देशासाठी शहीद झाले. भारत सरकारने त्यांचा सर्वोच्च अशोक चक्र देऊन सन्मान केला आहे. अशा थाेर अधिकाऱ्याविषयी असे बोलणे मोदी कसे काय सहन करतात, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला.

Trending