आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगेश गावातील कुणाचेही काम ऐकायचा, आज्ञाधारक होता, खूप आठवण येतेय, धायमोकलून रडताहेत आई-वडील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- कुणीही काम सांगितले तरी मंगेश नाही म्हणत नसे, त्याची खुप आठवण येत आहे असे पोलिसांना सांगत असताना त्याच्या आईवडीलाच्या डोळ्याला अक्षरश: धारा लागल्या होत्या. गुरूवारी तपास अधिकारी एपीआर मनोज पवार हे मंगेशच्या घरी विचारपूस करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी कथन केले. खुनाच्या तिसऱ्या दिवशीही मृतदेह हाती लागला नाही. पुन्हा श्वास पथक मागवण्यात आले होते.

 

तालुक्यातील चहार्डी येथून बारा वर्षीय शाळकरी मुलगा मंगेश दगडू पाटील हा 2 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा अखेर 5 रोजी खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. गावात आरोपी शोधण्यासाठी 50 पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अद्याप मंगेशचा मृतदेह हाती लागला नाही. मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. घटनेचे तपास अधिकारी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज पवार हे चहार्डीत दोन दिवसापासून ठाण मांडून बसले आहेत. या गुन्ह्यात वेगवेगळ्या दिशेने आरोपी शोधण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमण्यात आली अाहेत. त्या पथकांनी तपासासाठी चक्रे फिरवले आहेत.

 

चहार्डी येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयित भिक्षुकीचे छायाचित्र काढण्यात आले होते. त्या दिशेने देखील तपास सुरू अाहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र त्या 'चाम्प' नामक श्वानाकडून कोणताही तपास लागला नाही. चहार्डीतील शिवाजी नगर परिसरात स्मशान शांतता हाेती. मंगेशचे आजोबा व वडील हे एकटेच डोक्याला हात लावून बसले होते. आई जवळ गल्लीतील महिला सांत्वनासाठी बसलेल्या होत्या.

 

या वेळी तपास अधिकारी मनोज पवार यांनी गुरूवारी दुपारी 4.30 वाजता मंगेशच्या घरी जाऊन विविध वस्तूंची पाहणी केली आहे. त्यावेळी तो कोणाचे काम ऐकत असे, खूप आज्ञाधारक होता, त्याची खूप आठवण येत आहे असे त्यांच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या आईवडीलांना मंगेश कसा होता, शाळेतून आल्यावर लगेच बाहेर खेळायला जायचा का, त्याचे कोण कोण मित्र होते? असे विविध प्रश्न विचारले. या वेळी त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मोठी बहीण पोलिसांकडे पाहत होती तर आजोबा लोटन पाटील व वडील दगडू लोटन पाटील हेही ढसाढसा रडत होते. पोलिसांना सरपंच उषाबाई पाटील यांचे चिरंजीव दत्तात्रय पाटील व पोलिस पाटील रोहित रायसिंग यांचे सहकार्य मिळत आहे. ते देखील रात्रं-दिवस या मोहिमेत काम करत आहेत.

 

तपासाठी पथके रवाना; सर्वत्र शोध सुरू
गुन्ह्याच्या तपासासाठी धरणगाव येथील एपीआय हनुमान गायकवाड यांचे पथक शिरपूर, धुळे व चोपडा येथील पीएसआय आर. एस. तूरनर यांचे पथक चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात, पारोळा येथील पीएसआय खैरनार यांचे पथक चहार्डी परिसरातील जवळच्या खेड्यामध्ये, चोपडा एपीआय योगेश तांदळे यांचे पथक चहार्डी गावातील गावठाण नदी-नाले या भागात मंगेशचे अवयव शोधण्यासाठी फिरले. पारोळा येथील पीएसआय गजानन राठोड यांचे पथक बुधवारी सीसीटीव्हीद्वारे मिळालेल्या संशयित भिक्षुकीचा शोध घेण्यासाठी नेमले होते.

 

खदानीची केली पाहणी
गुरूवारी एपीआय मनोज पवार यांनी चहार्डी- वेले रस्त्यावरील 50 फूट खोल असलेली खदानीची पाहणी केली. तसेच लांब लांब जाऊन शेती शिवार, नाले, बांध, उभ्या पिकातील शेतीमध्ये पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...