आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारात तुकड्यांमध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, BF ला अटक; Cheating च्या संशयावरून खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील एका गटारात अल्पवयीन मुलाचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला आहे. बॉडीचे तुकडे करून वेग-वेगळ्या बॅगमध्ये गुंडाळून गटारात फेकण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारापुल्ला उड्डानपुलाजवळ मंगळवारी हा देह सापडला आहे. या प्रकरणात तिचा प्रियकर 20 वर्षीय रिझवान खान याला पोलिसांनी निझामुद्दीन परिसरातून अटक केली आहे. 


Cheating केल्याच्या संशयावरून हत्या
- पोलिस तपासात निझाम नगर परिसरात राहणारा रिझवान यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आपली अल्पवयीन प्रेयसी प्रेमात दगा देत असल्याच्या संशयावरून त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेग-वेगळ्या बॅगमध्ये पॅक केले. तसेच बारापुल्ला ब्रिजजवळ एका गटारात फेकून दिले. 
- पोलिसांनी केलेल्या चौकशीत रिझवानने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. गेल्या 11 महिन्यांपासून तो पीडित मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच तिचे दुसऱ्या एका तरुणासोबत अफेअर सुरू असल्याची माहिती कथितरित्या आपल्याला मिळाली होती. यानंतर झालेल्या वादात रिझवानने तिची निर्घृण हत्या केली. 

 

बातम्या आणखी आहेत...