आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईपासून ते पॅरिसपर्यंत हे आहेत भारतासहित जगातील 10 चोर बाजार, फुकट भावात विकले जाते सामान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला असे वाटत असेल की चोर बाजार फक्त भारतामध्ये भारतात तर तुम्ही चुकीचा विचार करत आहेत. जगभरातील विविध देशांमध्ये चोर बाजार भरतात. दूरवरून लोक येथे शॉपिंग करण्यासाठी येतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही 10 चोर बाजारांची माहिती देत आहोत.


लेस प्यूसेट दी सेंट, पॅरिस( फ्रांस )
सध्याच्या काळात मॉल्स व्यतिरिक्त ऑनलाईन शॉपिंगचीही सुविधा आहे. परंतु चोर बाजारात शॉपिंग करण्याची गोष्टच वेगळी आहे. लेस प्यूसेट जगातील सर्वात जुना चोर बाजार मानला जातो. 1800 च्या काळात शहरातून कचरा गोळा करणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा त्यांनी सेंट ओएनमध्ये वास्तव्य केले आणि कचरा गोळा करताना काही चांगल्या वस्तू मिळाल्या तर त्या वस्तू ते बाजारात आणून विकू लागले. हळू-हळू या मार्केटमध्ये चोरीचे सामनाही विकण्यात येऊ लागले. 


मुंबईचा चोर बाजार
दक्षिण मुंबईत मटन स्ट्रीट मोहम्मद अली मार्गावर हा चोर बाजार आहे. हा बाजार सुमारे 150 वर्षे जुना आहे. ‘शोर बाजार’ म्हणून हा बाजार प्रसिद्ध होता. कारण दुकानदार मोठ्या आवाजात आपल्या वस्तूची किंमत लावत होते. यामुळे बाजारात नेहमी गलबला असायचा. मात्र, ब्रिटिशांच्या काळात 'शोर' हा शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारल्याने या बाजाराचे नाव चोर बाजार असे पडले. येथे जुने कपडे, ऑटोमोबाइल पार्ट्स चोरीच्या घड्याळी चोरीच्या विंटेज व एंटीक वस्तू मिळतात. तुमच्या घरात चोरी झालेल्या वस्तू देखील तुम्हाला या बाजारात मिळतात, असे या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणता येईल.


दिल्लीचा चोर बाजार
देशातील हा सर्वात जुना चोर बाजार आहे. सुरुवातीला हा बाजार लाल किल्ल्याच्या मागे रविवारी भरत होता. सध्या हा बाजार दरियागंजमध्ये नाव्हेल्टी व जामा मशिदीजवळ भरतो.  याला भंगार बाजार असेही म्हटले जाते. हार्डवेअरपासून किचन इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात.


फिएरा दा लादरा, लिस्बन
'फिएरा दा लादरा'चा अर्थ बाजार. या मार्केटचा जन्मच चोरीचे सामान विकण्यासाठी करण्यात आला होता. येते सामानाची किंमत खूप कमी असते, यामुळे लोकांचे हे बेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन मानले जाते. 


केव क्रीक थीव्स मार्केट, एरिजोना ( US )
US मधील हा सर्वात प्रसिद्ध बाजार ऑक्टोबर ते मे महिन्याच्या काळातच भरतो. शॉपिंग करताना दुकानदार तुम्हाला ज्या पद्धतीने दुकानात बोलावतात, याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु येथे शॉपिंगचा अनुभव तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत.


लस्कर रॉ (हॉंगकॉंग)
चीनच्या रिच हेरिटेजविषयी सर्वांनाच माहिती असेल. तेथील या फेमस मार्केटमध्ये तुम्हाला नकली चायनीज माल भरपूर मिळेल आणि तुम्ही लकी ठरलात तर तुम्हाला ओरिजनल सामनाही स्वस्तामध्ये मिळू शकते.


ख्लॉंग थोम (बँकॉक)
हा चोर बाजार रात्री लागतो. चोर सामान घेऊन विकण्यासाठी रात्री येथे येतात. या मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्वात जास्त विकल्या जातात. या व्यतिरिक्त ब्रँडेड कपडेही मिळतात.


इतर चोर बाजारांविषयी जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...