आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Choreographer Ganesh Acharya Opens Up On Tanushree Duttas Allegation On Nana Patekar

नानांनंतर तनुश्रीचे कोरिओग्राफरवर गंभीर आरोप, गणेश आचार्याने खोडून काढले सर्व आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर (67) यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप एका मुलाखतीत केला आहे. तसेच मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोपही तिने यावेळी केले. 10 वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नानांनी गैरवर्तन केल्याचे तनुश्री म्हणाली आहे. मात्र बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आर्चाय यांनी तनुश्रीचे आरोप खोडून काढत नानांची पाठराखण केली आहे. गणेश आचार्य नानांच्या बाजुने उभा राहिल्यानंतर तनुश्रीने गणेश आचार्यवरही गंभीर आरोप केला आहे. साहजिकच गणेश नानाची बाजू घेणारच, कारण ते देखील यात सामील होते, असे तनुश्री म्हणाली आहे. माझ्यामुळेच गणेश आचार्य यांना या चित्रपटात काम मिळाले होते, पण आता गणेश खोटे बोलत असल्याचे तनुश्रीने सांगितले.  

 

काय म्हणाले गणेश आचार्य... 
नानांची पाठराखण करताना गणेश आचार्य म्हणाले, ‘या खूप जून्या गोष्टी आहेत. मला यातले नेमके काही आठवत नाही. मात्र नानांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांना सेटवर बोलावले नव्हतं. काही गैरसमजातून गाण्याचे चित्रीकरण काही तास थांबवण्यात आले होते. मात्र नानाने तिच्यासोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले नाही.’ 

 

तनुश्रीने नाना पाटेकरांवर केलेले आरोप... 
2008 साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले असा आरोप तनुश्रीने ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. #metoo मोहीमेबद्दल बोलताना तिने नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केले. नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने केले आहेत. त्यावेळी कुणीही मला साथ दिली, सगळे बघ्याच्या भूमिकेत होते. मी घरी जात असताना नानांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती, असेही ती म्हणाली.  

 

बातम्या आणखी आहेत...