Home | Sports | From The Field | Chris gayle fastest batsman to complete 4000 runs

विंडीज एक्स्प्रेस ख्रिस गेलच्या सर्वात वेगवान 4 हजार धावा; ठरला जगातील पहिला फलंदाज

वृत्तसंस्था | Update - Mar 27, 2019, 10:58 AM IST

पहिल्याच सामन्यात तुफानी 79 धावांची खेळी; करिअरमध्ये 25 व्या अर्धशतकाची नाेंद

 • Chris gayle fastest batsman to complete 4000 runs

  जयपूर - विंडीजच्या स्फाेटक फलंदाज ख्रिस गेलने झटपट क्रिकेटच्या छाेट्या फाॅरमॅट टी-२० मध्ये तुफानी फटकेबाजी केली. यासह त्याने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. आपल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर त्याने साेमवारी यजमान राजस्थान राॅयल्सविरुद्ध ७९ धावांची खेळी केली.


  यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंदवला. अशा प्रकारे वेगवान ४ हजार धावा नाेंदवणारा ताे जगातील पहिला फलंदाज ठरला. किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करताना त्याने यंदाच्या सत्राला अर्धशतकाने सुरुवात केली. त्याच्या याच फटकेबाजीच्या बळावर पंजाबने यजमान राजस्थानला १४ धावांनी पराभूत केले. यासह पंजाबला पहिल्याच सामन्यात शानदार विजयी सलामी देता आली. त्यामुळे आता आगामी सामन्यातही गेलच्या झंझावाती खेळीवर सर्वांची नजर असणार आहे.


  गेलचे २५ वे अर्धशतक : राजस्थान राॅयल्सच्या सुमार गाेलंदाजीचा समाचार घेताना गेलने सहज ७९ धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या करिअरमध्ये २५ व्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ४७ चेंडूंचा सामना करताना ७९ धावा काढल्या. यामध्ये आठ चाैकार आणि ४ उत्तंुग षटकारांचा समावेश आहे. यासह त्याला यंदाच्या सत्रातील आपले पहिले अर्धशतक साजरे करता आले. या सामन्यातील अव्वल फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता ताे आपली ही तुफानी फटकेबाजीची लय अशीच कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी त्याने नुकतेच संकेत दिले आहेत.


  ३० मेनंतर वादळ शमणार
  येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये वनडेच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. याच विश्वचषकादरम्यान विंडीजचा स्फाेटक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे मागील दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदानावर तुफान वेगाने येणारे हे कॅरेबियन वादळ आता लवकरच शमणार असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याने आपण व्यावसायिक लीगमध्ये खेळणार असल्याचेही सांगितले.


  ११२ डावांत ४ हजार धावा; डेव्हिड वाॅर्नरला आता टाकले मागे
  ख्रिस गेलने आता आयपीएलच्या आपल्या ११२ व्या डावात अर्धशतक झळकावले. यासह त्याला सर्वात वेगवान ४ हजार धावांचा पल्ला गाठता आला. आता त्याच्या नावे ४ हजार ७३ धावांची नाेंद झाली. यातून त्याला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनी (४०१६) आणि डेव्हिड वाॅर्नरला मागे टाकता आले. वाॅर्नरने हा पल्ला ११४ डावांत गाठला हाेता. त्यापेक्षाही अधिक सरस खेळी करताना गेलने हा पराक्रम ११२ डावांत गाजवला.

Trending