आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिश करणाऱ्या महिलेला गुप्तांग दाखवल्याचा होता आरोप; स्टार क्रिकेटर ख्रिस गेलने जिंकला अब्रुनुकसानीचा खटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - वेस्टइंडीजचा स्टार क्रिकेटर ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियाच्या एका मीडिया ग्रुपविरुद्ध तीन लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचा अब्रुनुकसानीचा खटला जिंकला आहे. या खटल्यात दावा करण्यात आला होता की, गेलने एका मालिश करणाऱ्या तरुणीला आपले गुप्तांग दाखवले होते.

फेयरफॅक्स मीडियाने 2016 मध्ये अनेक आर्टिकल्समधून गेलवर हे आरोप लावले होते. फेयरफॅक्स मीडिया सिडनी मार्निंग हेराल्ड आणि द एजचे प्रकाशन करते. त्यांनी आरोप केला होता की, सिडनीमध्ये 2015ला ड्रेसिंग रूममध्ये गेलने एका महिलेसोबत असे अश्लील वर्तन केले होते.

 

गेलने हे आरोप फेटाळून लावत म्हटले की, पत्रकारांनी त्यांना बरबाद करण्यासाठी हे सर्व केले आहे. न्यू साउथ वेल्स सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस लूसी मॅक्युलम यांनी कंपनीला भरपाईचे आदेश देत म्हटले की, या आरोपांमुळे गेल यांना खूप मनस्ताप सोसावा लागला आहे. दुसरीकडे, फेयरफॅक्सने म्हटले आहे की, या निकालाविरुद्ध आम्ही लगेच अपील करणार असल्याचा विचार करत आहोत.

 

सिक्सर किंग म्हणवला जाणारा हा खेळाडू आपल्या मैदानाबाहेरील वर्तनामुळेही नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटपटूंच्या रात्रभर मॉडेल्ससोबत सुरू असणाऱ्या पार्ट्या या सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. परंतु काहीही झाले तरी गेलने हा खटला जिंकून तो निर्दोष असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे क्रिससाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, क्रिकेटपटू ख्रिस गेलचे आणखी काही फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...