आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chris Lynn Head Steam: Video Of Steaming Head Of Cricketer Chris Lynn After Caught Out During Psl Match Gone Viral News And Updates

झेलबाद झाल्यानंतर रागात ख्रिस लिनच्या डोक्यातून निघत होत्या अशा वाफा, व्हायरल झाला व्हिडिओ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तान सुपर लीग मालिकेतून समोर आलेला ख्रिस लिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान गाजतोय. यामध्ये आउट झाल्यानंतर ख्रिसचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तसेच त्याच्या डोक्यातून अक्षरशः वाफा निघत होत्या. लाहोर कलंदर्स आणि पेशावर जल्मी यांच्या सामना सुरू होता. लाहोर कलंदर्सकडून ख्रिस लिन खेळत होता आणि अचानक बाद झाला. याच विकेटनंतर ख्रिसच्या डोक्यातून रागाने वाफा निघत होत्या. पाकिस्तानात झालेल्या या सामन्यामध्ये लाहोर कलंदर्सला 12 षटकांमध्ये 133 धावांचे लक्ष्य होते. ख्रिस लिन ओपनिंग बॅट्समन होता. त्याने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 30 धावा ठोकल्या. या दरम्यान ग्रेगोरीच्या बॉलिंगवर तो षटकार मारण्यासाठी पुढे आला आणि हसन अलीने त्याला झेलबाद केले.

बातम्या आणखी आहेत...