आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 12 काेटी नागरिक दुसऱ्या ठिकाणी नाताळ साजरा करण्यासाठी पडले बाहेर; युरोपात प्लास्टिकविरोधात जनजागृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातील १६० देशांमध्ये नाताळ सणाचा जल्लाेष सुरू अाहे. जगातील एक तृतीयांश लोकसंख्या हा उत्सव साजरा करत अाहे. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येत (जवळपास ३३ काेटी) १२ काेटी नागरिक नाताळची सुटी साजरी करण्यासाठी अलास्का, मिशीगन, पेन्सिल्व्हेेनियासह वेगवेगळ्या ठिकाणी गेले अाहेत. सर्वाधिक नागरिकांनी न्यूयॉर्क शहरास प्राधान्य दिले अाहे. न्यूयाॅर्कमध्ये १० लाखांपेक्षा जास्त नागरिक नाताळ साजरा करण्यासाठी पाेहोचले अाहेत. दुसरीकडे युरोपमध्ये चेक गणराज्य, जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये नाताळचा जल्लोष साजरा केला जात अाहे. या वर्षी नाताळचा सर्वात चांगला बाजार म्हणून अॅस्टोनियातील टॅलीनला पहिली पसंती दिली जात अाहे. या वर्षी अनेक युरोपीय देशांनी सोशल मीडियावरून प्लास्टिक संदर्भात जनजागृती सुरू केली अाहे. प्लास्टिकपासून तयार झालेल्या वस्तू भेट म्हणून देऊ नका, वापरू नका, असे अावाहन केले जात अाहे. ऑस्ट्रेलिया, जपान इको फ्रेंडली उत्सव साजरा करत अाहे. 

हे प्रथमच हाेत अाहे... 


युक्रेन : ७ जानेवारीएेवजी २५ डिसेंबर राेजी नाताळ 
किव्ह|युक्रेनच्या इतिहासात प्रथमच नाताळ २५ डिसेंबर राेजी साजरा केला जात अाहे. हा बदल देशातील संसदेने तीन डिसेंबर राेजी जॉर्जियन कॅलेंडर लागू केल्यामुळे झाला. यापूर्वी युक्रेनमध्ये साेव्हियत संघाच्या काळातील जूलियन कॅलेंडर लागू हाेते. त्यामुळे नाताळ ७ जानेवारी राेजी साजरा हाेत हाेता. 

 

तीन देशांमध्ये नाताळची अनोखी परंपरा 
स्वीडनमध्ये बनवतात बकरा : स्वीडनमधील गेवल केसल स्क्वेयरवर १३ मीटर उंच बकऱ्याची प्रतिकृती तयार केली जाते. नातळला ती पेटवण्याची परंपरा अाहे. 

हा फाेटाे चीनमधील उत्तर-पूर्वी हिलोंगजियांग भागातील अाहे. येथे संताच्या वेशभूषेत वजा ३१ डिग्री सेल्सियस तापमानात एकाच वेळी गरम पाणी वरती फेकले. त्यानंतर हवेतच या पाण्याचे बर्फाचे ढग झाले. 

 

हा विरोधाभास : चीनमधील अनेक शहरांत सांतावर घातले निर्बंध 
चीनमध्ये काही ठिकाणी नातळचा सण उत्साहात साजरा केला जाताे, तर दुसरीकडे विरोधाभाससुद्धा अाहे. येथील हेबेई प्रांतात लँगफँग शहरात पालिकेने नाेटीस काढली अाहे. त्यात रस्त्यांवर नाताळची झाडे, संतावर प्रतिबंध केला अाहे. नांगयांगसह अनेक शहरांत ख्रिसमस ट्री दिसत नाही. 

बातम्या आणखी आहेत...