आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Christmas : YouTuber Created A Video Of Giving Gifts From The Plane, Which Saw By 10 Million Viewers In 2 Days

यूट्यूबरने विमानातून गिफ्ट वाटतांना व्हिडिओ बनवला, हा व्हिडिओ 2 दिवसांत 1 कोटी लोकांनी पाहिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या नाॅर्थ कॅराेलिनामध्ये राहणारा युट्यूबवरील मिस्यर बीस्ट उर्फ जिमी डाेनाल्डसनचा ख्रिसमस स्पेशल व्हिडीओ गेल्या दाेन दिवसांपासून सर्वाधिक पाहिला जात आहे. त्यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने जगभरच्या रूग्णालय, अनाथालयांना १० हजार विविध प्रकारच्या भेटवस्तू स्वत: पाठवल्या. दाेन दिवसांत १ काेटी ३२ लाख लाेकांनी बीस्टचा व्हिडीओ युट्यूबवर पाहिला आहे. त्याचसाेबत १४ लाख प्रेक्षकांनी त्यास पसंती दिली आणि सुमारे १.५ लाख काॅमेंट्स आल्या आहेत. २३ डिसेंबरच्या व्हिडीओमध्ये ते न्यूयाॅर्क, वाॅशिंग्टन डीसीसह संपूर्ण अमेरिकेत भेटवस्तू वाटप करताना दिसले. सर्वाधिक गिफ्ट रूग्णालयातील मुलांना देण्यात आले. त्यात अनेकविध प्रकारच्या खेळण्यांचा समावेश हाेता. खेळणी पाहून मुलांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले हाेते. मात्र मिस्टर बीस्टला वाटले इतके सारे गिफ्ट वाटण्यास कितीतरी दिवस लागतील. त्यानंतर त्याने एक जेट विमान भाड्याने घेतले, दाेन मित्र जॅक फ्रॅंकलिन आणि काॅनर सटन यांच्या मदतीने जगभरात गिफ्ट वाटण्यासाठी ताे निघाला. ले बाेनेहेर हाॅस्पीटलला जाण्यासाठी त्यांनी ट्रकभर खेळणी साेबत नेली हाेती. जेेथे मिस्टर बीस्ट आणि त्यांचे मित्र पाेहचू शकत नव्हते त्या शहरांमध्ये त्यांनी ट्रान्सपाेर्टच्या माध्यमातून खेळणी, कपडे, केक, मिठाई, कुकीज, जेवण, काेट, माेजे, उबदार कपडे, पादत्राणे यासह अन्य गरजेच्या वस्तू भेट स्वरूपात पाठवल्या. काेणत्या व्यक्तीला किंवा मुलास कशाची गरज आहे, हे ओळखूनच ते गिफ्ट देत असत. या त्रिकुटाच्या प्रयत्नांचे काैतुक करीत लाेक त्यांचा उत्साह वाढवत आहेत. बीस्ट म्हणाला, २०२० मध्ये काही निवारा स्थळे उभारणार आहे. या माध्यमातून अनाथ मुले, वयस्कर लाेकांची मदत करायची आहे. यावर्षी बीस्टने हजाराे डाॅलर्स राेख देऊन अनेक गरजूंना मदत केली हाेती.

1.32 कोटी व्ह्यूज

अमेरिकेच्या नाॅर्थ कॅराेलिनामध्ये राहणारा युट्यूबवरील मिस्यर बीस्ट उर्फ जिमी डाेनाल्डसनचा ख्रिसमस स्पेशल व्हिडीओ गेल्या दाेन दिवसांपासून सर्वाधिक पाहिला जात आहे. त्यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने जगभरच्या रूग्णालय, अनाथालयांना १० हजार विविध प्रकारच्या भेटवस्तू स्वत: पाठवल्या. दाेन दिवसांत १ काेटी ३२ लाख लाेकांनी बीस्टचा व्हिडीओ युट्यूबवर पाहिला आहे. त्याचसाेबत १४ लाख प्रेक्षकांनी त्यास पसंती दिली आणि सुमारे १.५ लाख काॅमेंट्स आल्या आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...