आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1971 WAR: या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाने इंदिरा गांधींविरुद्ध वापरले होते अपशब्द; पाकचे समर्थन करणाऱ्या अमेरिकेला 13 दिवसांत असे नमविले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारताच्या इतिहासात 3 डिसेंबर हा दिवस अविस्मरणीय आहे. 1971 मध्ये याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने भारतावर अचानक हल्ला केला. यानंतर भारताने असे प्रत्युत्तर दिले, की पाकिस्तानची साथ देणारा अमेरिका सुद्धा काहीच करू शकला नाही. पाकिस्तानला पराभूत करत भारताने बांग्लादेशला स्वतंत्र केले. त्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी समोरासमोर होते. त्यावेळी सुद्धा अमेरिकेचा विरोध करण्याची हिंमत कुठल्याही देशात नव्हती. तरीही, भारताच्या आयर्न लेडीने रिचर्ड निक्सन यांचे सर्व डावपेच उधळून लावले आणि पाकवर जबरदस्त हल्ला केला. त्यावर निक्सन इतका संतप्त झाला होता, की त्याने चक्क इंदिरा गांधींबद्दल शिवराळ भाषा वापरली होती.


अमेरिकेने भारतावर हल्ल्यासाठी पाठवल्या होत्या युद्धनौका
> पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांग्लादेशात पाकिस्तानी लष्कराकडून नरसंहार सुरू होता. तेथील स्थानिक कट्टरपंथिय आणि प्रतिबंधित जमातच्या नेत्यांना पाठीशी घेऊन पाकिस्तानी लष्कर हा अत्याचार करत होते. 
> बंडखोरीचा सूर निघताच त्या भागात जाऊन पाकिस्तानी लष्कर पुरुषांना भर चौकात आणून गोळ्या झाडत होते. तसेच महिलांचे अपहरण करून त्यांना सेक्स स्लेव्ह बनवण्याचे प्रकार सुरू होते. 
> याचवेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशची मदत करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशातील हिंसाचारातून पळणाऱ्यांना त्यांनी सीमा खुली केली आणि भारतात त्यांना राहायला जागा दिली. 
> एवढेच नव्हे, तर भारतीय लष्कराला बांग्लादेशात पाठवण्याची तयारी सुरू केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनला हे आवडले नाही. जगात भारताचा दबदबा वाढेल हे ते त्यांना पचत नव्हते. 
> भारताने बांग्लादेशात हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधींना दिला होता. 
> मात्र, इंदिरा गांधींवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. निक्सनच्या धमक्यांवर दुर्लक्ष करत त्यांनी भारतीय लष्कर बांग्लादेशात घुसणारच असा ठाम निश्चय घेतला होता. 
> यावर निक्सनला आपला आत्मसन्मान दुखावल्याचे वाटले. त्याने पाकिस्तानची मदत करण्यासाठी भारताच्या विरोधात आपल्या नौदलाचा 7th युद्धनौकेचा ताफा रवाना केला.


इंदिरांना म्हणाला 'बिच', तर भारतीयांना 'बास्टर्ड्स' 
भारतीय सैनिक पाकिस्तानात घुसले तेव्हा राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि त्याचा सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर चर्चा करत होते. ही माहिती 2011 मध्ये समोर आलेल्या अमेरिकेच्या गुप्त कागदपत्रांतून समोर आली आहे. इंदिरा गांधींनी जागतिक महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा धुडकावून लावलाच कसा? याचा राग निक्सन आणि किसिंजर या दोघांना होता. यामुळेच निक्सनने चर्चेत इंदिरा गांधींना बिच आणि हेनरीने भारतीय नागरिकांना बास्टर्ड्स अशी शिवी दिली होती.


मग इंदिरा गांधींनी दिली धमकी
> युद्ध सुरू होण्याच्या 4 महिन्यांपूर्वी अर्थात जुलै महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किसिंजर पाकिस्तान दौरा करून भारत भेटीला आले होते. 
> याचवेळी इंदिरा गांधी आणि किसिंजर यांच्यात बांग्लादेश संदर्भात चर्चा झाली. बांग्लादेशात पाकिस्तानी लष्कर अमानवीय अत्याचार करत असल्याचे इंदिरांनी किसिंजर यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, किसिंजर यांनी ते मान्य करण्यास नकार दिला.
> त्यावेळी इंदिरा गांधींनी किसिंजर यांना धमकावले, की तुम्ही काही करणार नसाल, तर आम्हालाच काही करावे लागेल. 
> किसिंजर यांनी इंदिरांकडे हैराण होऊन पाहत विचारले, की तुम्ही काय करणार आहात. तेव्हा इंदिरांनी त्याच बैठकीत सामिल जनरल मानेकशॉ यांच्याकडे बोट दाखवत सांगितले की आम्हाला यांची मदत घ्यावी लागेल.


फक्त 13 दिवसांत संपवले युद्ध
जनरल मानेक शॉ यांनी इंदिरा गांधींना आश्वस्त केले होते, की आपण एका आठवड्यातच पूर्व पाकिस्तानला नेस्तनाबूत करू. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. मात्र, मानेक शॉ यांच्या नेतृत्वातील सैन्याचा पाकिस्तान सामना करू शकला नाही. अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानचे सैन्य तोंडावर पडले. 16 डिसेंबर रोजी भारताने बांग्लादेशला मुक्त केले. या युद्धात बांग्लादेशींवर अत्याचार करणाऱ्या 91000 पाकिस्तानी सैनिकांनी सुद्धा पकडून त्यांनी भारतात आणले. मात्र, पाकिस्तान सरकारच्या विनंतीनंतर त्या युद्धबंदींना मुक्त करण्यात आले. युद्धानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी इतक्या खुश होत्या, की त्यांनी जनरल मानेकशॉ यांना फील्ड मार्शल बनवले.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या ऐतिहासिक क्षणांचे आणखी काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...