Home | International | Pakistan | cia-to-visit-abottabad

अमेरिका घेणार लादेनच्या घराची झडती, हल्ले बंद करण्यासाठी पाकचे आर्जव

agency | Update - May 27, 2011, 01:09 PM IST

अखेर पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकले आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला एबोटाबाद येथील लादेनच्या घराची झडती घ्यायला पाकिस्तानने...

 • cia-to-visit-abottabad

  वॉशिंग्टन... अखेर पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकले आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला एबोटाबाद येथील लादेनच्या घराची झडती घ्यायला पाकिस्तानने सहमती दर्शविली आहे.
  अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या पाकिस्तान दौर्याच्या पूर्वी पाकिस्तानने सीआयएला झडतीची परवानगी दिल्याने या घटनेला विशेष महत्त्व आले आहे. आता अमेरिकेची फोरेन्सिक चमू एबोटाबाद येथील लादेनच्या त्या घरात जाऊन आधुनिक उपकरणांच्या मदतीने भिंतीत आणि जमिनीखाली गाढलेल्या गोष्टींचा तपास करणार असल्याचे अमेरिकी अधिकार्यानी स्पष्ट केले आहे. या तपासातून अलकायदासंबंधी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अमेरिकेने वर्तविली आहे.
  पाकिस्तानकडून परवानगी मिळाल्यानंतर सीआयएचे अधिकारी पहिल्यांदाच एबोटाबादला पोहोचत आहेत. याआधी सीआयएचे एजंट उपग्रह आणि गुप्तचरांच्या मदतीने या घरावर लक्ष ठेवून होते. 2 मे रोजी अमेरिकी कमांडर्सनी विशेष मोहीम आखून लादेनचा खात्मा केला होता.
  अमेरिकी अधिकारर्यानी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सीआयए चमू एबोटाबादला जाईल आणि अलकायदाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आदी गोळा करेल. 2 मेच्या मोहिमेच्या वेळी पुरावे गोळा करणे शक्य झाले नव्हते.
  पाकिस्तान सरकारने अमेरिकेपुढे लोटांगण घातल्यामुळे पाकिस्तानी जनतेत संताप धुमसत असून याचा कधीही स्फोट होऊ शकतो असे जाणकारांना वाटते.
  हिलरी क्लिंटन पाकिस्तानात
  दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन पाकिस्तानात पोहोचल्या आहेत. या दौरर्यात त्या पाकिस्तानी सेनेतील वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि, सेनाप्रमुख जनरल कयानी आणि आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांच्याशी वार्तालाप करणार आहेत. अमेरिकेशी तणावाचे संबंध निर्माण झाले असताना हिलरी क्लिंटन पाक दौरर्यावर येत आहेत, त्यामुळे या दौरर्याला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान जरदारी यांनी क्लिंटन यांच्याकडे द्रोण हल्ले बंद करण्यासाठी आर्जव सुरू केल्याचे वृत्त आहे.Trending