आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णूर इंडिया मेगा कंपनीतील अन्नधान्य घोटाळ्याचा सीआयडी तपास थंडबस्त्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीतील अन्नधान्य घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे गेल्यापासून हे प्रकरण थंड बस्त्यात गेल्यात जमा आहे. या प्रकरणाचा आता नेमका कोण तपास करीत आहे, तपास कुठपर्यंत आला याचा काहीही मागमूसही लागत नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठीच सरकारने हे प्रकरण गुप्तचर विभागाकडे तपासासाठी दिल्याची चर्चा आता जोर धरत आहे. 


तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीवर दि. १८ जुलै रोजी धाड घालून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १० ट्रक पकडले. या ट्रकमधील धान्य मेगा कंपनीत काळ्या बाजारात विक्री होत होते या आरोपावरून कृष्णूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास प्रारंभी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तथापि या प्रकरणाची व्याप्ती पाहता या तपासाची सूत्रे सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. हा तपास इतका सूक्ष्म करण्यात आला की त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार आणि मेगा कंपनीचे व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांचे जामीन अर्ज बिलोली सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. तापडिया यांचा जामीन अर्ज तर दोन वेळा फेटाळण्यात आला.   
कोणाचीही मागणी नव्हती : तपास अधिकारी नुरुल हसन यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत निर्भीड, नि:पक्ष, निःस्वार्थीपणे केला. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. जीपीएस प्रणाली, टोलनाक्यावरील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ चित्रीकरण असे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले. आरोपी कोणत्याही प्रकारे या प्रकरणातून सुटणार नाहीत याची काळजी घेत नुरुल हसन यांनी या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा केले. त्यांच्या तपासामुळेच प्रारंभी केवळ १० ट्रक सार्वजनिक वितरण प्रणालीतील अन्नधान्याची काळ्या बाजारात विक्री या प्रकरणाची व्याप्ती, इंडिया मेगा कंपनीतील जवळपास ४०० कोटींच्या धान्य घोटाळ्यापर्यंत वाढली. नुरुल हसन यांच्या प्रामाणिक तपासामुळेच हे प्रकरण गुप्तचर विभागाकडे सोपवावे अशी मागणी कोणीही केली नाही. भाजपचे माजी महानगराध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य चैतन्यबापू देशमुख यांनी तर या घोटाळ्याची दिव्य मराठीत छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे जोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.


या प्रकरणाचा तपास नुरुल हसन यांच्याकडून काढण्यात येऊ नये व तो गुप्तचर विभागाकडे देऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. परंतु तरीही कालांतराने या 
प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे दिला. आता त्यालाही जवळपास महिना होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...