आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cigarate Condom Coffee And Many Items Deliver Late Night By Dunzo Delivery App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉफीपासून कंडोमपर्यंत, सर्व डिलीवरी करते ही कंपनी, रात्रभरात कधीही करु शकतो ऑर्डर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात ऑनलाइन साहित्य बोलावणे सामान्य झाले आहे. आज लोक कपड्यांपासून तर जेवणापर्यंत सर्व काही ऑर्डर करतात आणि हे काही मिनिटात, तासांतच आपल्याजवळ असते. पण तुम्हाला घरबसल्या "कॉफी पासून कंडम"पर्यंत सर्व काही मिळाले तर... आणि ही डिलीवरीची सुविधा रात्रभरासाठी असेल तर... ही सुविधा खरंच अनोखी असेल ना. 24 तास डिलीवरी करणारी एक कंपनी ही सुविधा उपलब्ध करुन देते. ऑनलाइन सामानाची डिलीवरी करणारी ही कंपनी Dunzo ने 2018 मध्ये डिलीवर ऑर्डरचा डाटा आपल्या ब्लॉगवर शेअर केला आहे. 

 

308 लोकांनी एका रात्रीत दोन वेळा कंडोमची ऑर्डर केली 
ही कंपनी आपल्या जवळच्या ठिकाणी असलेले आपले आवडते आणि गरजेचे सामान आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. या कंपनीने 13,517 गर्भनिरोधकांची डिलीवरी केली आहे. यामध्ये सर्वात खास म्हणजे 308 लोकांनी एकाच रात्री 2 वेळा कंडोम ऑर्डर केले. Dunzo ने जारी केलेल्या डाटानुसार, त्यांनी 2018 मध्ये 33478 साहित्याची रात्री उशीरा डिलीवरी केली आहे यामध्ये सिगारेट, कोल्ड ड्रिंक आणि कॉफी सर्वांत जास्त मागवले जाणारे सामान आहे. 
कंपनी म्हणते की, या डाटावरुन सिध्द होते की, भारताच्या शहरातील लोक आळशी होत आहेत. तर काही लोकांना जे साहित्य स्टोरमधून खरेदी करताना लाज वाटते, ते साहित्य त्यांनी ऑनलाइन मागवले. यासोबतच 4 हजार लोकांनी कॉफी, 6 हजार लोकांना दही आणि हजारो लोकांनी गरजेच्या वस्तूंची डिलीवरी केली.


Dunzo नुसार, त्यांनी 2018 मध्ये 33478 वेळा रात्री उशीरा साहित्य डिलिवर केले. Dunzo ने व्हेलेंटाइन डेला एका व्यक्तीला 89 आइस्क्रीम टब्सची डिलीवरी केली. Dunzo ने दावा केला की, त्यांनी 2018 मध्ये आपल्या ग्राहकांच्या 23,92,816 तासांची बचत केली. त्यांनी सर्वात कमी वेळेत म्हणजे 7 मिनिटात बंगळुरुमध्ये सलादच्या ऑर्डरची डिलीवरी केली. कंपनीने 42 किलोमीटर दूर एका केकची डिलीवरीही केली आहे.