आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कसमध्ये सिंहासोबत सुरू होता खेळ, अचानक केला प्रेक्षकांमधील 4 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया - एका सर्कसमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका स्थानिक सर्कसमध्ये सिंहासोबत प्रात्याक्षिक सुरू होते. ट्रेनर हे प्रात्याक्षिक दाखवत असताना अचानक सिंह पिंजरा तोडून प्रेक्षकांमध्ये शिरला. सिंहाने या प्रेक्षकांमध्ये असलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला.

 

सिंह लोकांमध्ये घुसताच सगळीकडे हाहाकार उडाला. लोक पळायला लागले. भितीचे वातावरण तयार झाले. यादरम्यान अनेक रिंगमास्टर सिंहावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सिंहाने सेनिया नावाच्या या 4 वर्षीय चिमुरडीच्या डोक्यावर चावा घेतला. बऱ्याच प्रयत्नांनतर या चिमुरडीला सिंहाच्या तावडीतून सोडवण्यात आले. 

 

मुलगी गंभीर 

मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॅास्पिटलकडून सांगण्यात आले आहे. ही चिमुरडी हातात झेंडा हलवत होती. त्याकडे आकर्षित होत सिंहाने तिच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

रशियात आजही सर्जकशीत प्राण्यांचा वापर 

अशा प्रकारचे अपघात घडल्यामुळे आणि प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनांमुळे अनेक देशांमध्ये सर्कशीत प्राण्यांच्या वापरावर बॅन करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...