आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबैतुल(मध्यप्रदेश)- मुले पळवणारी टोळी असल्याचे समजून यापूर्वी जमावाने मारहाण आणि हत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण मध्य प्रदेशात धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील बैतुल जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या दोन नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले पण आरोपी पसार झाले होते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बैतुल जिल्ह्यातील शाहपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. काँग्रेस नेते धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी ललित बारस्कर गुरुवारी रात्री केसिया गावामधून कारने जात होते. यावेळी गावातील रस्त्यावर फांद्या पडलेल्या होत्या, त्या फांद्या पाहून ते घाबरले आणि त्यांनी कार पुन्हा माघारी वळवली.
कार परत फिरत असल्याचे पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले आणि कारवर हल्ला चढवला. मुलं पळवणारी टोळी असल्याची गावकऱ्यांना शंका आली आणि त्यांनी या तीनही नेत्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात कारचेही मोठे नुकसान झाले, शिवाय नेत्यांनाही दुखापत झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.