आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Citizenship Amendment Act CAA News Updates: West Bengal Governor Jagdeep Dhankhar, Shown Black Flags By Jadavpur University Students

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांनी राज्यपालांना विद्यापीठात जाण्यापासून रोखले; कारमधूनही उतरू दिले नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल म्हणाले- ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील शिक्षणाला वेठीस धरले
  • विद्यार्थी म्हणतात- भाजप नेत्यांसारखे सीएएला समर्थन करत आहेत राज्यपाल

कोलकाता - पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठात आंदोलक विद्यार्थ्यांनी राज्यपालांचा मार्ग अडवला. त्यांना विद्यापीठात प्रवेश करणे सोडाच, कारमधून उतरू दिले नाही. यानंतर राज्यपालांना विद्यापीठ परिसरातून बाहेर पडावे लागले. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवर निदर्शने करत आहेत. त्यांनाच समजावून सांगण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड विद्यापीठात जात होते. या घटनेचा राज्यपालांनी तीव्र निषेध केला. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

विद्यार्थी म्हणतात- भाजप नेत्यांसारखे सीएएला समर्थन करत आहेत राज्यपाल

जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी आणि डावे समर्थक संघटनांच्या वतीने सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व कायदा रद्द करावा अशी मागणी त्यांनी लावून धरली. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला राज्यपाल धनकड यांचे समर्थन आहेत असा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे, की "राज्यपाल एखाद्या भाजप नेत्यासारखे या कायद्याचे समर्थन करत आहेत. राजभवन पश्चिम बंगालमध्ये संघाचे मुख्यालय बनले आहे." अशात जेव्हा राज्यपाल विद्यापीठात येण्याचे प्रयत्न करत होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना कारमधून उतरू दिले नाही. यानंतर चोख सुरक्षा बंदोबस्तात त्यांना राजभवनात परत नेण्यात आले.

राज्यपालांची राज्य सरकारवर टीका
 
राज्यपालांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. एक राज्यपाल आणि कुलगुरू म्हणून मी फार दुखी आहे. पश्चिम बंगाल सरकारने विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. विद्यापीठात जात असताना माझा मार्ग देखील अडवण्यात आला. जवळपास 50 जणांनी मला कारमधून उतरूच दिले नाही. याला विद्यापीठ प्रशासन देखील जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.