आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Citizenship Amendment Bill (CAB) Protest Assam, Guwahati, Northeast News Updates

ईशान्येत तीव्र विरोध : गुवाहटीमध्ये लोकांकडून संचारबंदीचे उल्लंघन, सैन्याचा फ्लॅग मार्च; मोदी म्हणाले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाम, त्रिपुरासह ईशान्येकडील राज्यात तीव्र विरोध
  • इंडियन युनियन मुस्लिम लीगने सुप्रीम कोर्टात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात दाखल केली याचिका

गुवाहाटी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला ईनान्य राज्यांतून तीव्र विरोध सुरुच आहे. सोमवारपासून सुरु असलेले आंदोलन चौथ्या आणखीनच चिघळले आहे. विधेयकाचा विरोध करत लोकांनी गुरुवारी संचारबंदीचे उल्लंघन केले. या आंदोलानकडे पाहत रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आसाम आणि त्रिपुराकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कामाख्या आणि गुवाहटीमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. तर सैन्य शहरात फ्लॅग मार्च करत आहे.  

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले - मी आसामच्या माझ्या बंधू आणि भगिनींना आश्वासन देऊ इच्छितो की, विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांना काळजी करण्याची गरज नाही. दरम्यान इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल)ने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कपिल सिब्बल याबाबत बाजू मांडणार आहेत. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला बुधवारी मंजूरी मिळाली.  
मोदींनी ट्विट केले की, मी त्यांना सांगू इच्छितो की कोणीही तुमचे अधिकार, ओळख आणि संस्कृती तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. याची नेहमीच भरभराट आणि विकसीत होत राहील. केंद्र सरकार आसामच्या घटनात्मक सुरक्षा, भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक संस्कृतीसाठी वचनबद्ध आहे.
 

बातम्या आणखी आहेत...