आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Citizenship Amendment Bill, Lathicharge On North East Students During Bandh By North East Students Organisation

आसामात नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज; ईशान्य भारतात लष्कर तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी / नवी दिल्ली - राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा होत असताना त्याचे तीव्र पडसाद ईशान्य भारतात उमटले. आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. आसाममध्ये हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने मार्च काढला. तर डिब्रूगडमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ठिक-ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये सुद्धा संतप्त जमाव रस्त्यांवर उतरला. येथे राज्य सरकारने इंटरनेट पुरवठा बंद केला आहे.

नॉर्थ ईस्ट स्टूडंट ऑर्गनायझेशन (नेसो) च्या नेतृवत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला 30 संघटनांचा पाठिंबा आहे. ईशान्य भारतात सुधारित नागरिकत्व विधेयक लागू झाल्यास येथील भाषा, संस्कृती आणि ओळख धोक्यात येईल अशी भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा कायदा ईशान्य भारताच्या सुरक्षेसाठीच लागू केला जात असल्याचा दावा राज्यसभेत केला. परंतु, ईशान्य भारतातील स्थानिकांच्या मनातील शंका अजुनही दूर झालेल्या नाहीत.

भाजप खासदाराच्या घरात घुसले आंदोलक

आसामच्या गुवाहाटी, डिब्रूगड आणि जोरहाटमध्ये आंदोलनाने रौद्र रूप धारण केले. येथे नागरिकत्व विधेयकाचा विरोध करताना हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत. गुवाहाटी आणि डिब्रूगड विद्यापीठात होणाऱ्या बुधवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. आसाममध्ये महामार्ग अडवण्यात आले आणि आग सुद्धा लावण्यात आली. ऑल आसाम स्टूडंट यूनियनचे सदस्या आंदोलन करताना खासदार क्वीन ओझा यांच्या घरात घुसले. तसेच भाजप नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे सुद्धा जाळण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा शर्मा यांच्या घराबाहेर काळे झेंडे दाखवण्यात आले. डिब्रूगडमध्ये विद्यार्थ्यांनी 10 किमी पदयात्रा काढली. त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.