आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पेशल डेस्क - भारतात सेक्स अतिशय खासगी गोष्ट आहे. आपल्या देशात प्रेमी जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी किस करणे तर सोडा हॉटेलमध्ये सुद्धा त्रास दिला जातो. गतवर्षी कोलकात्यात तर एका कपलने सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मिठी देण्यावरून सुद्धा मोठा वाद झाला होता. अशात एक देश असाही जेथील एका एका भागात प्रशासनाने नागरिकांना खुल्या आकाशाखाली चक्क सेक्स करण्याची परवानगी दिली आहे. अर्थातच येथील पार्क असो वा बीच कपल्सला खुलेआम सर्वच काही करता येईल. यासाठी त्यांना कुणीही अडवणार नाही.
एकच अट!
मेक्सिकोतील शहर ग्वादलजारा येथे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 15 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात नागरिकांसह नगरसेवकांनी सुद्धा खुलेआम सेक्स करण्याच्या परवानगीसाठी मोहिम राबवली होती. त्यालाच आता कायदेशीर परवानगी मिळाली आहे. यापुढे ग्वादलजारा शहरात पार्किंग, पार्क, रिकाम्या आणि पडीक इमारती, रिकाम्या जागा, जंगल अथवा कारमध्ये सुद्धा वाट्टेल तेथे सेक्स करता येईल. यात एक अट अशी की ज्या ठिकाणी कपल सेक्स करत आहेत तेथील नागरिकांनी पोलिसांना तक्रार दाखल करू नये. अन्यथा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल.
यामुळे घेतला निर्णय
स्थानिक नेते मॉर्फिन ओतेरो यांनी या मोहिमेला कायद्याचे स्वरुप देण्यासाठी सिंहाचा वाटा दिला. त्यांनी विद्यापीठ आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. विविध प्रकारचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये बहुतांश लोकांनी अशा स्वरुपाच्या कायद्याची मागणी केली होती. कपल कुठेही रोमान्स करत असल्यास पोलिस त्यांना त्रास देतात. तसेच त्यांना अटक करून पैसे वसूल केले जातात अशा प्रकारच्या तक्रारी आल्या. हा त्रास कमी करता यावा म्हणून आणि नागरिकांच्या वाढत्या मागणीवरून कायदा बनवण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.