Home | News | City Palace's 3-D Replication at the Pre-Wedding Ceremony of Isha Ambani

ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग समारंभात सिटी पॅलेसची थ्री-डी प्रतिकृती

आेंकार कुलकर्णी | Update - Dec 09, 2018, 08:49 AM IST

पाहुण्यांत सुरींपासून मित्तलपर्यंत अनेकांनी लावली हजेरी

  • City Palace's 3-D Replication at the Pre-Wedding Ceremony of Isha Ambani

    उदयपूर- देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या विवाहापूर्वीचे विधी राजस्थानातील उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी येथे अनेक तंत्रज्ञांसह टीम दाखल झाली आहे. रविवारी येथे ईशा अंबानी यांचा विवाहपूर्वी समारंभ पार पडेल. मुख्य कार्यक्रम द पॅलेस सॉयर आहे. तो ७.३० वा. पासून सुरू होईल. येथे ड्रेस कोड काळा टाय किंवा भारतीय पारंपरिक वेशभूषा. इस्रायलच्या स्काय प्रॉडक्शनकडे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. येथे थ्री-डी सिटी पॅलेसही साकारला जाणार आहे. अनेक भलेमोठे एलईडी पॅनलही लावले आहेत. त्यावर व्हिडिआे लावले जातील. जगभरातील कलाकार येथे आपल्या कलेचे सादरीकरण करतील.

    पाहुण्यांत सुरींपासून मित्तलपर्यंत अनेकांनी लावली हजेरी
    ईशा यांच्या विवाहपूर्वी समारंभात सहभागी होण्यासाठी पाहुण्यांची गर्दी झाली आहे. एचसी हाँग सॅमसंग, वायल वेल्सलर सीईआे एचपी, राजीव सुरी (नोकिया), जे.ली. (उपाध्यक्ष, सॅमसंग), ए.एस. पॉलराज (प्रोफेसर स्टॅनफोर्ड), प्रोफेसर कालूज, केन हिचनर, अध्यक्ष गोल्डमन सॅक्श निकोलस अगुजिन, जे.पी. मॉर्गन, फरहान फारुकी, बिल विंटर्स, एल.एन मित्तल, उषा मित्तल इत्यादी बड्या हस्ती आल्या आहेत.

Trending