आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णालयाने नाकारले उपचार 'सिव्हिल'ने दिले नवजीवन; प्रकृती अत्यवस्थ झाल्याने दुसरीकडे दाखल करण्याचा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंतापूर-ताहाराबादच्या डोंगरावर ट्रेकिंगला जाताना अचानक भोवळ येऊन पडलेल्या ट्रेकरला सहकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयाने उपचार नाकारत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून सिव्हिलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी उपचार केल्याने या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले. 

 

अंतापूर (ताहाराबाद) येथील सतीश ब्राह्मणकर हे मित्रांसोबत अंतापूर-ताहाराबाद परिसरातील डोंगरावर मित्रांसोबत ट्रेकिंगला गेले होते. सटाणा परिसराजवळ त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले. मित्रांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी प्रकृती बघून उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर मित्र आणि नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने नाशिकला हलविले. 

 

तीन तासांच्या प्रवासात जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला होता. परिस्थिती बघता नातेवाइकांनी सर्व आशा सोडून दिली होती. नाशिकमध्ये येताच त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणीही डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. अखेरचा पर्याय म्हणून ब्राह्मणकर यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. आयसीयू विभागात १० दिवस डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ब्राह्मणकरांना शुद्ध आली. साक्षात मृत्यूच्या दाढेतून ते बाहेर आले.

 

सिव्हिलचे डॉक्टर व परिचारिका विशेषतः
आयसीयू विभागाच्या सर्व परिचारिका व कर्मचाऱ्यांनी घरातील माणसासारखी सुश्रुषा केली. म्हणूनच मी आज कुटुंबियात असल्याची भावना व्यक्त करत ब्राह्मणकरांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ब्राह्मणकर यांनी प्रथम आयसीयू कर्मचाऱ्यांचे अाभार व्यक्त केले. रुग्णालयाने जीवनदान दिल्याने हे ऋण जीवनभर विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, अधिसेविका मानिनी देशमुख, परिसेविका शोभा सोनवणे, टाकळकर यांच्यासह सर्व स्टाफ, कर्मचाऱ्यांनी ब्राह्मणकरांना पुष्पगुच्छ देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
 

बातम्या आणखी आहेत...