Home | National | Delhi | CJI Mishra will attend important hearing before retirement

समलैंगिकतेवर ऐतिहासिक निर्णय देणारे मिश्रा निवृत्तीपूर्वी या खटल्यांवरही करणार सुनावणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:44 PM IST

आधार, अयोध्या वाद, सबरीमाला मंदिरात पिरियड्सदरम्यान महिलांच्या प्रवेशावर बंदी अशा खटल्यांवर मिश्रा सुनावणी करणार आहेत.

 • CJI Mishra will attend important hearing before retirement

  नवी दिल्ली - समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचे प्रमुख होते सरन्यायाधीश दीपक मिश्रा. मिश्रा हे 2 ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. पण त्यापूर्वीच्या कामकाजात ते इतरही अनेक महत्त्वाच्या सुनावणींवर निर्णय देणार आहेत. यात आधार, अयोध्या वाद, सबरीमाला मंदिरात पिरियड्सदरम्यान महिलांच्या प्रवेशावर बंदी, व्याभिचार कायद्यात भेदभावाचे प्रकरण आणि एससी/एसटींनी पदोन्नतीत आरक्षणासह अनेक म्हत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.


  दीपक मिश्रांसमोर सुनावणीसाठी येणाऱ्या खटल्यात एक महत्त्वाचा खटला राजनेत्यांच्या गुन्हेगारी प्रकरणाबाबतचाही असेल. यात कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणात नेत्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे याबाबत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना राजकारणापासून दूर ठेवण्यास मदत होईल.


  या सर्व प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पीठाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मित्रा यांच्या कामाचा अखेरचा दिवस एक ऑक्टोबर 2018 असेल. त्याचे कारण म्हणजे दोन ऑक्टोबर 2018 ला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यादिवशी गांधीजयंती असल्याने सुटी आहे.


  या 19 दिवसांत दाऊदी बोहरा समुदायातील महिलांच्या खतना परंपरेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. सरकारने खतना परंपरा शारीरिक पूर्णत्वाला भंग करणारी असल्याचे म्हणत, हा महिलेच्या सन्मानाचा भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच पारसी महिलांशी संबंधित प्रकरणावरही सुनावणी पूर्ण होईल. यात गैर-पारसी व्यक्तीशी लग्नानंतर पित्याच्या अंत्य संस्कारासह समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून महिलेला वंचित करण्याबाबतच्या मुद्द्यावर निर्णय होईल.


  अयोध्या प्रकरणाचा विचार करता 2010 च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आवाहन देण्याच्या प्रकरणात तीन न्यायाधीशांचे पीठ सुनावणी करणार की त्यापेक्षा मोठे पीठ सुनावणी करेल याबाबत निर्णय़ होणार आहे. मुस्लीम प्रतिवादींनी या प्रकरणाची सुनावणी मोठ्या पीठाकडून व्हावी अशी मागणी केली आहे.

Trending