आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीशांनी संचालक वर्मांच्या वकिलास फटकारताना जाब विचारला- जबाब कसा लीक झाला? तुम्ही सुनावणीस अपात्रच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दाेन काेटींची लाच घेतल्याच्या अाराेपांचा सामना करणारे सीबीअायचे संचालक अालाेक वर्मा यांनी सर्वाेच्च न्यायालयाला सीलबंद लिफाफ्यात दिलेला जबाब अगाेदरच लीक झाला अाहे. त्यामुळे मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश रंजन गाेगाेई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्मांचे वकील फली एस. नरिमन यांना फटकारत हा जबाब कसा काय लीक झाला? असा प्रश्न विचारला. याशिवाय सीबीअायचे डीअायजी मनीष सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डाेभाल व केंद्रीय मंत्री हरिभाई चाैधरी यांच्यावर विशेष संचालक राकेश अस्थानांविराेधात तपास प्रभावित केल्याचे अाराेप केले हाेते, तेही माध्यमांत प्रकाशित झाल्याने कोर्ट नाराज झाले. दाेन्ही प्रकरणांत नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही सर्व जण सुनावणीस पात्रच नाहीत.  


सीव्हीसीने वर्मांविराेधात तपास केला हाेता व त्यावर वर्मांकडून जबाब मागवण्यात अाला हाेता. दुसऱ्या प्रकरणात सिन्हा यांनी डाेभाल यांच्यावर अस्थानांच्या घराची झडती राेखणे व सीबीअायवर दबाव टाकण्यासाठी चाैधरींवर काेट्यवधी रुपये घेतल्याचा अाराेप केला अाहे.  

 

- पीठाने वर्मांचे वकील फली एस. नरिमन यांना विचारले- माध्यमांच्या बातम्या पाहा व सांगा हे कसे झाले? उत्तर- माहीत नाही, ६७ वर्षांच्या कारकीर्दीत असे झाले नाही.

 

सुनावणी सुरू हाेताच पीठाने वर्मांचे वकील फली एस. नरिमन यांना माध्यमांतील बातम्या दिल्या व सुनावणी टाळली. त्यावर नरिमन यांच्या विनंतीवरून सुनावणी पुन्हा सुरू झाली; परंतु पुन्हा एकदा टळली. शेवटी सुनावणी २९ नाेव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात अाली.
पीठ: मिस्टर नरिमन, अालाेक वर्मांचे वकील म्हणून नव्हे, तर तुम्ही या संस्थेच्या सन्माननीय व ज्येष्ठ सदस्यांपैकी एक अाहात म्हणून अाम्ही तुम्हास माध्यमांतील या बातम्या दाखवत अाहाेत. अाम्हाला सहकार्य करा. सांगा, हा जबाब कसा काय लीक झाला?  
नरिमन:(माध्यमांचे वृत्त पाहिल्यानंतर) मला याबाबत काहीही माहीत नाही.
पीठ : संस्थांचा सन्मान व मर्यादा कायम राखली पाहिजे. हे न्यायालय अाहे. कुणीही येऊन कुणावरही अाराेप लावण्याचा हा प्लॅटफाॅर्म नाही.   
नरिमन: मला तर हेदेखील माहीत नाही की, गाेपाल हेसुद्धा या प्रकरणाच्या सुनावणीत अाहेत. त्यांना जबाब सादर करण्यासाठी कुणीही अधिकृत केलेले नाही. (यानंतर नरिमन व गाेपाल यांच्यातही चर्चा झाली. नरिमन यांनी त्यांना चूप राहण्यास सांगितले.)  
पीठ: संस्थांचा सन्मान व मर्यादा कायम राखली पाहिजे. हे न्यायालय अाहे. कुणीही येऊन कुणावरही अाराेप लावण्याचा हा प्लॅटफाॅर्म नाही.   
नरिमन: न्यायालयात माझी ६७ वर्षे गेली; परंतु अशी घटना कधीही घडली नाही. इतका निराश मी यापूर्वी कधीही झालाे नाही. 
पीठ : वर्मांचा जबाब व सिन्हांची अाराेप असलेली याचिका लीक हाेणे गंभीर व हरकत घेण्यासारखे अाहे. त्यामुळे तुमच्यापैकी कुणीही सुनावणीस पात्रच नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध हाेते.   

 

राहुल- दिल्लीत क्राइम थ्रिलर सुरू अाहे

राहुल गांधी टि्वट करून म्हणाले की, दिल्लीत ‘चाैकीदारच चाेर’ नावाचे क्राइम थ्रिलर सुरू अाहे. नव्या एपिसाेडमध्ये डीअायजींनी मंत्री व एनएसएवर गंभीर अाराेप लावलेत. गुजरातमधून अाणलेला सहकारी काेट्यवधींची वसुली करत अाहे. अधिकारी थकलेत.. विश्वासाला तडा गेला... लाेकशाही रडतेय. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...