आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CJI Recuses From Hearing Plea Challenging Rao's Appointment As Interim CBI Chief

काळजीवाहू CBI प्रमुखांच्या नियुक्तीविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वीच सरन्यायाधीशांची माघार; दिले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयचे नवे प्रमुख एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीच्या विरोधात सुनावणी घेण्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी सुनावणीतून माघार घेतली. एम नागेश्वर राव यांना सीबीआयचे काळजीवाहू प्रमुख करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात कॉमन कॉजने याचिका दाखल केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे खंडपीठ त्यावर सुनावणी घेणे अपेक्षित होते. परंतु, नवीन सीबीआय प्रमुखासाठी विशेष निवड समिती बैठक घेणार आहे. त्याच समितीचे आपण सदस्य असल्याने नागेश्वर राव यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेऊ शकणार नाही असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.


नवीन सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करणाऱ्या उच्च अधिकार समितीमध्ये पंतप्रधान, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती या समितीचे सदस्य असतात. रंजन गोगोई याच समितीचे सदस्य आहेत. कॉमन कॉजन नावाच्या एका एनजीओने सीबीआयच्या काळजीवाहू प्रमुख पदी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती मनमानी कारभार आणि कायद्याच्या विरोधात जाऊन केल्याचे म्हटले आहे. याच कारणास्तव 23 ऑक्टोबर रोजी एम नागेश्वर राव यांची नियुक्त रद्द करण्यात आली. तरीही पुन्हा सरकारने त्यांची नियुक्ती कशी केली असा जाब सरकारला विचारण्यात आला आहे. यासंदर्भातील याचिकेवर आता 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...