आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Claim : India And China Stake Claim On Sowa Rigpa, India Said This Is Our Medical Practice

उपचाराच्या या पद्धतीवर भारत व चीनने युनेस्कोकडे केला दावा; ही तर आमची प्राचीन चिकित्सा पद्धती; भारताकडून पुरावे देणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवन कुमार 

नवी दिल्ली - आयुर्वेदाप्रमाणेच सोवा रिग्पा ही अाणखी एक पद्धती आहे. या पद्धतीने भारतात शेकडो वर्षांपासून उपचार सुरू आहेत. यामुळे भारताने या उपचारावर दावा करण्यासाठी युनेस्कोकडे धाव घेतली. चीननेही युनेस्कोकडे धाव घेतली आहे.  दोघांनीही युनेस्कोकडे दिलेल्या अर्जात या पद्धतीवर आपला हक्क सांगितला आहे. युनेस्कोकडे दिलेल्या अर्जात भारताने म्हटले, सोवा रिग्पा भारतातील चिकित्सा पद्धती आहे. याला इंटेजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्यूमॅनिटीच्या यादीत समाविष्ट करावे. तथापि, चीनने म्हटले ही आमची प्राचीन उपचार पद्धती आहे. यावर चीनचा हक्क आहे. चीनच्या या दाव्यानंतर भारताने युनेस्कोला देण्यासाठी पॅथीशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. तर या पद्धतीवर दोन देशांच्या दाव्यामुळे युनेस्कोला निर्णय घेण्यास विलंब होत आहे. तत्पूर्वी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत देशात प्रथमच एका नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पा तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

कॅन्सरसह अनेक आजारांवर उपयुक्त

हिमालयीन भाग सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, हिमाचलमधील धर्मशाला, लाहौल स्पिती, लडाख व काही इतर भागात सोवा रिग्पा पद्धती खूप प्रचलित आहे. यासाठी जडी-बुटीपासून औषधी तयार होते. अस्थमा, आर्थरायटिस, कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांवर या पॅथीने उपचार केला जातो.तीन शहरांत सुरू होणार महाविद्यालये

आयुष मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, भारतातील ही सर्वात जुनी चिकित्सा पद्धती असून या पॅथीच्या शिक्षणापासून चिकित्सा प्रॅक्टिससाठी नियम-कायदे तयार करण्यात आले आहेत. प्रथमच लेह, सारनाथ व गंगटोक या तीन शहरात प्रत्येकी एका महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयात १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...